Join us
Daily Top 2Weekly Top 5

फुलांची सजावट, ताटात पंचपक्वान अन्...; प्राजक्ता गायकवाडच्या पहिल्या केळवणाचा थाट, फोटो आले समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:47 IST

लग्नाची लगबग सुरु! थाटात पार पडलं प्राजक्ता गायकवाडचं  पहिलं केळवण, फोटो आले समोर 

prajakta gaikwad married soon: मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अलिकडच्या काळात मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार विवाहबंधनात अडकले. अक्षय केळकर, अक्षर कोठारी तसंच अमृता माळवदकर या कलाकारांनंतर आता मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री बोहल्यावर चढणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. नुकतेच या अभिनेत्रीच्या पहिल्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

मराठी कलाविश्वातील या  नायिकेनं आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेने तिला घराघरात ओळख मिळवून दिली. अलिकडेच ७ ऑगस्टला प्राजक्ताचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर प्राजक्ताच्या घरी आता लग्नाची लगबग सुरु झाल्याची पाहायला मिळतेय. अभिनेत्री पुण्यातील उद्योगपती शंभुराज खुटवड यांच्यासोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. नुकतंच अभिनेत्रीचं केळवण मोठ्या थाटात पार पडलं आहे. 

प्राजक्ता गायकवाडने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पहिल्या केळवणाचे फोटो शेअर केले आहे. छान फुलांची सजावट आणि पंच पक्वानांचं ताट अशी तयारी तिच्या केळवणाला करण्यात आली आहे. प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल झाले आहेत.दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड यांचा २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.२४ वाजता हा लग्नसोहळा संपन्न होणार आहे.सोशल मीडियार प्राजक्ताचे केळवणाचे फोटो पाहून कलाविश्वातील सेलिब्रिटी आणि तिच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Prajakta Gaikwad's pre-wedding celebrations begin with traditional 'Kelvan' feast.

Web Summary : Actress Prajakta Gaikwad, known for 'Swarajyarakshak Sambhaji,' is set to marry businessman Shambhuraj Khutwad on December 2, 2025. Recently, pre-wedding 'Kelvan' feast photos surfaced, showcasing floral decorations and a traditional multi-course meal. The event has garnered much attention and best wishes.
टॅग्स :प्राजक्ता गायकवाडसेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडियाव्हायरल फोटोज्