Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीनीने केलं फणसाचं लोणचं; सांगितली आईची सिक्रेट रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 17:14 IST

Samidha guru: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री समिधा गुरु हिने स्वयंपाक घरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

कलाविश्वातील सेलिब्रिटींना जसं चाहत्यांकडून प्रेम मिळत असतं तसंच बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. यात खासकरुन अभिनेत्रींना या ट्रोलिंगचा जास्त अनुभव येतो. अनेकदा अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरुन, त्यांच्या अभिनयावरुन वा वैयक्तिक जीवनातील गोष्टींवरुन ट्रोल केलं जातं. परंतु, मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री समिधा गुरु हिने स्वयंपाक घरातील एक व्हिडीओ शेअर करत अनेकांची तोंड बंद केली आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समिधा गुरु. उत्तम अभिनयामुळे ओळखली जाणारी समिधा तिच्या वैदर्भीय भाषेमुळेही तितकीच ओळखली जाते. समिधा बऱ्याचदा इन्स्टाग्रामवर तिच्या मैत्रिणींसोबतचे काही व्हिडीओ पोस्ट करत असते. यात काही वेळा ती तिच्या लेकीसोबत वा घरातील काही कामांचेही फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करते. मात्र, यावेळी तिने उन्हाळी कामं करतानाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना तिच्या आईची सिक्रेट लोणच्याची रेसिपी सांगितली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकाच्या घरी पापड, लोणचं अशी उन्हाळी कामं केली जातात. यात मराठमोळ्या अभिनेत्रीदेखील मागे नाहीत हे समिधाने दाखवून दिलं आहे. समिधाने या व्हिडीओमध्ये कच्च्या फणसाचं लोणचं केलं आहे. सोबतच हे लोणचं करण्यासाठी तिच्यासोबत अभिनेत्री भार्गवी चिरमुलेदेखील असल्याचं पाहायला मिळतं.  

टॅग्स :समिधा गुरूसेलिब्रिटीटेलिव्हिजन