Join us
Daily Top 2Weekly Top 5

विषयच हार्ड! 'मास्तरीण बाई बनल्या शेतकरीण बाई'; नव्या फोटोने वेधलं लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 15:41 IST

'सांग तू आहेस का', 'आम्ही दोघी', 'बन मस्का' यांसारख्या मालिकांमधून काम करत अभिनेत्री शिवानी रांगोळे लोकप्रिय झाली.

Shivani Rangole: 'सांग तू आहेस का', 'आम्ही दोघी', 'बन मस्का' यांसारख्या मालिकांमधून काम करत अभिनेत्री शिवानी रांगोळे लोकप्रिय झाली. दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर तिने चाहत्यांची मनं जिंकली. 

सध्या मालिकाविश्वात झी मराठीवर 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. अत्यंत कमी वेळातच या मालिकेने प्रेक्षकांना दखल घ्यायला लावली आहे. अभिनेत्री शिवानी रांगोळेने या मालिकेत अक्षरा नावाचं पात्र साकारलं आहे. त्यातील मास्तरीणबाई आणि अधिपती यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे.

शिवानी सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टिव्ह असल्याची पाहायला मिळते. वेगवेगळे फोटो तसेच व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. जो पाहून चाहते शिवानीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. व्हायरल फोटोमध्ये मास्तरीण बाईंनी भगव्या रंगाची साडी नेसली असून हातात विळा घेत फोटो काढलाय. मास्तरीण बाईंचा हा  गावरान लूक चर्चेचा विषय ठरलाय. शिवानीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एका यूजरने या फोटोवर कमेंट करत म्हटलंय, "आता शोभलात कोल्हापूरकर" तसेच आणखी एकाने "अधिपतीची मास्तरीण बाई " अशी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवानी ही सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची सून आहे. मृणाल कुलकर्णी यांचा लेक विराजस कुलकर्णीबरोबर शिवानीने लग्न केलं आहे. 

टॅग्स :शिवानी रांगोळेटेलिव्हिजनटिव्ही कलाकारव्हायरल फोटोज्