Join us

कामानिमित्त काश्मीरला जाणार होती 'ही' मराठी अभिनेत्री पण...; पोस्ट शेअर करत म्हणाली- "देव सतत तुम्हाला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 09:59 IST

कामानिमित्त काश्मीरला जाणार होती 'ही' मराठी अभिनेत्री पण...; दहशतवादी हल्ल्यानंतर पोस्ट शेअर करत म्हणाली...

Rupali Bhosale Post:जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील बैसरन भागात मंगळवारी (२२ एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. हा हल्ल्यात दहशतवाद्यांनी  निष्पाप लोकांवर बेछूट गोळीबार केला. सरकारने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. या अमानवी कृत्याच्या सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. दरम्यान,या प्रकरणी राजकीय वर्तुळासह अनेक कलाकार मंडळी देखील आपली मतं मांडताना दिसत आहेत. नुकतीच सोशल मीडियावर अभिनेत्री रुपाली भोसलेने (Rupali Bhosale) एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. 

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर रुपाली भोसलेने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यामातून पोस्ट शेअर करत व्यक्त झाली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटलंय, "देव सतत तुम्हाला काहीतरी संकेत देत असतो. आज दुपारी मला एका शूटसाठी कॉल आला आणि ते म्हणाले लोकेशन काश्मीर असेल. मी त्यांना सांगितलं डेट्स बघते आणि कळवते आणि काही तासात ही बातमी आली." असं म्हणत अभिनेत्री तिच्या चाहत्यांना महत्वाची अपडेट सांगितली आहे. रुपाली भोसलेची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

दरम्यान, काश्मीरमधील या हल्ल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. देशाच्या सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत यामध्ये सहभागी असलेल्या कोणालाही सोडलं जाणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. 

टॅग्स :रुपाली भोसलेपहलगाम दहशतवादी हल्लाजम्मू-काश्मीरसोशल मीडिया