Join us

"पहिल्या भेटीत तिला पाहिलं अन्..." अशी आहे नीरज-मृणालची लव्हस्टोरी, म्हणाला- "लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइड...."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 13:06 IST

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस सध्या चर्चेत आहे.

Mrunal Dusanis : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) सध्या चर्चेत आहे. लवकरच अभिनेत्री अभिनय क्षेत्रात कमबॅक करते आहे. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना मृणालने लग्नाचा निर्णय घेतला आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर ती मायदेशी परतली आहे. आता अभिनेत्री नव्या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मृणालने अनेक गोष्टींविषयी खुलासे केले आहेत.

नुकतीच दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मृणाल दुसानिसने पती नीरजसह लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत  नीरज मोरेने त्यांच्या लव्हस्टोरीचा किस्सा शेअर केला आहे. या मुलाखतीत नीरज म्हणाला, "आमच्या नात्याची सुरूवात अशी झाली की आमचे एक फॅमिली फ्रेंडस आहेत, त्यांनी आमची ओळख करून दिली. तेव्हा पाहताच क्षणी असं वाटलं की हीच माझी जीवनसाथी असणार आहे. हे पहिल्यांदा मृणालला भेटल्यानंतर मला वाटलं. मग पुढे त्याप्रमाणे गोष्टी घडत गेल्या". 

पुढे नीरज म्हणाला, "त्यानंतर मृणालसोबत माझं लग्न झालं. हे सगळं लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइड म्हणण्यासारखं आहे. जरी अरेंज मॅरेज असलं तरी पहिल्या भेटीतच आम्हाला वाटलं की आम्ही एकमेकांसाठीच बनलो आहोत". 

मृणाल दुसानिसच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर,  ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मालिकेमधून अभिनेत्री मृणाल दुसानिसने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. तू तिथे मी’, ‘हे मन बावरे’ या मालिकांमधून अभिनेत्री मृणाल दुसानिस घराघरांत पोहोचली.  

टॅग्स :मृणाल दुसानीसटेलिव्हिजनसेलिब्रिटी