Join us

अभिषेक-सोनालीच्या संगीत सोहळ्यात अभिनेता पियूष रानडेने गायलं रोमँटिक गाणं; व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 16:52 IST

अभिषेक-सोनालीच्या संगीत सोहळ्यात अभिनेता पियूष रानडे गायला खास गाणं, व्हिडीओची सर्वत्र चर्चा. 

Piyush Ranade: 'सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतील श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकर नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. अभिषेकने सोशल मीडियावर इन्फ्ल्यूएन्सर सोनाली गुरवसोबत लग्नगाठ बांधली. कोकणातील मालवणमध्ये त्यांचा   विवाहसोहळा थाटात पार पडला. सध्या मराठी कलाविश्वात या दोघांच्या लग्नाची चर्चा आहे. अभिषेक आणि सोनालीच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील कलाकारही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. पियुष रानडे, सुरुची अडारकर तसेच अशोक शिंदे, हर्षद अतकरी यांनी विवाहसोहळ्यात खास उपस्थिती दर्शवली. दरम्यान, सोशल मीडिया अभिषेक-सोनालीच्या संगीत सोहळ्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.  या व्हिडीओमध्ये सुरांची मैफिल रंगल्याची पाहायला मिळते आहे.

सोशल मीडियावर पियुष रानडेचा अभिषेक-सोनालीच्या संगीत सोहळ्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पियुष 'प्यार हमें किस मोड पे ले आया' हे गाणं गाताना दिसतोय. अभिषेक सोनालीच्या लग्नाला आलेल्या सगळ्या मंडळींना पियुषच्या गाण्याल दाद देत त्याचं कौतुक केलं आहे. पियुषच्या गायनाची सगळीकडे चर्चा होत आहे. 

दरम्यान, अभिषेक आणि सोनाली अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी सोशल मीडियावर देखील अनेक फोटो शेअर केले होते. यानंतर यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या दोघांचा साखरपुडा पार पडला. आता दोघांनी लग्न करून त्यांच्या नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे. 

टॅग्स :पियुष रानडेटिव्ही कलाकारसेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडिया