Join us

सबसे कातील गौतमी की...? गौतमीला टक्कर देणाऱ्या 'संध्या पाटील'चा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 15:33 IST

गौतमीला टक्कर म्हणून संध्या पाटीलही तुफान चर्चेत आहे बरं का! तिचा खुळखुळा गाण्यावरील डान्स सध्या व्हायरल होतोय.

सबसे कातिल गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते. अचानक ही धुळ्याची गौतमी महाराष्ट्राच्या लाखो तरुणांच्या मनावर राज्य करत आहे. गावागावात होणाऱ्या तिच्या कार्यक्रमांना इतकी गर्दी होते की अक्षरश: राडा होतो आणि पोलिसांना लाठीचार्जही करावा लागतो. तर दुसरीकडे गौतमीला टक्कर म्हणून संध्या पाटीलही (Sandhya Patil) तुफान चर्चेत आहे बरं का! 

गौतमी पाटीलचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर प्रत्येक कार्यक्रमासाठी गौतमी लाखो रुपये घेते. पण आता संध्या पाटील या तरुणीनेही तिच्या डान्सने सर्वांना घायाळ केले आहे. तिचेही व्हिडिओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. तिचा सध्या 'खुळखुळा' गाण्यावरील डान्स प्रचंड व्हायरल होतोय. गौतमीला टक्कर द्यायला संध्या आली असल्याच्या कमेंट लोकांनी केल्या आहेत.

Gautami Patil reaction, Video Leak: व्हिडीओ लीक प्रकरणानंतर पहिल्यांदाच मिडियाशी बोलली गौतमी पाटील, वाचा काय म्हणाली.

गौतमी पाटील सध्या अनेकांना आपल्या तालावर नाचवत आहे. तिच्या अश्लील नृत्याने ती सुरुवातील चर्चेत आली होती. मात्र नंतर तिने माफी मागत पुन्हा असं करणार नसल्याचं स्पष्ट केलं. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात राडा होणार हे जवळपास नक्कीच असतं. तर संध्या पाटीलला अजून तितकी लोकप्रियता मिळालेली नाही. मात्र संध्याचेही असे डान्स बघून लवकरच ती देखील अडचणीत येऊ शकते. तर दुसरीकडे आता दोघींची जुगलबंदी कधी बघायला मिळणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय.

टॅग्स :गौतमी पाटीलसोशल मीडियासोशल व्हायरल