Join us

Video : क्रांती रेडकर का लपून पितेय ज्युस?, व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 07:00 IST

क्रांती रेडकरचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला येईल हसू

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आतापर्यंत अनेक सिनेमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. आजही कोंबडी पळाली तंगडी धरून हे कानावर पडलं की क्रांतीचा चेहरा डोळ्यासमोर तरळू लागतो. क्रांती आता सिनेइंडस्ट्रीत तितकीशी सक्रीय नाही. मात्र ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून तिथून चाहत्यांसोबत संपर्कात असते. तसेच ती फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

क्रांतीने ब्रेकफास्ट करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत ती टोमॅटो केचअपच्या बाटलीमागे ज्युसचा ग्लास लपवून ज्युस पिताना दिसत आहे. ज्युस पिण्याआधी तिची मिश्किल स्माईल सांगून जाते की ही कोणाला तरी फसवून ज्युस पिते आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, कॅनमधील ज्युस माझ्या बाळांसाठी चालत नाही. त्यात ते माझ्यासोबतच सेम टेबलवर ब्रेकफास्ट करताना बसले आहेत. त्यामुळे मग मला असं त्यांच्यापासून लपून ज्युस प्यावा लागत आहे. मला खात्री आहे की असे बऱ्याच जणांसोबत होत असेल. जर तुम्ही पालक किंवा भावंड असाल तर तुम्हाला हे रिलेट करेल,

क्रांतीने मार्च २०१७मध्ये आयपीएस अधिकारी समीर वानखेडेसोबत लग्न केले. क्रांतीला दोन जुळ्या मुली आहेत. 'जत्रा' सिनेमातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्यामुळे क्रांतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिनं 'ऑन ड्युटी 24 तास', 'माझा नवरा तुझी बायको', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे' यांसारख्या सिनेमात अभिनयाची जादू दाखवली.

अभिनयासह तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे. तिने 'काकण' या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते. गेल्या महिन्यात तिचा रॉकी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तितका चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :क्रांती रेडकर