Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rekha kamat : याला जीवन ऐसे नाव! ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 15:54 IST

Rekha kamat: गेल्या ६० वर्षांपेक्षा अधिक काळ त्या कलाविश्वात सक्रीय होत्या. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून रेखा कामत यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं.

मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्री रेखा कामत (Rekha Kamat) यांचं निधन झालं आहे. त्या ८९ वर्षाच्या होत्या. वृध्दापकाळामुळे रेखा कामत यांची प्राणज्योत मालवली असून माहिम येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या ६० वर्षांपेक्षा अधिक काळ त्या कलाविश्वात सक्रीय होत्या. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून रेखा कामत यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. विशेष म्हणजे त्यांची प्रत्येक भूमिका प्रचंड गाजली असून त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

रेखा कामत यांचा अल्पपरिचय

रेखा कामत यांचं माहेरचं नाव कुमुद सुखटणकर. दादरमधील इंडियन एज्युकेशन सोसायटीमध्ये रेखा कामत यांचं शालेय शिक्षण झालं. शैक्षणिक शिक्षण घेत असतांनाच त्यांनी कथ्थक आणि भरतनाट्यमचेही धडे गिरवले. तसंच भानुदास मानकामे व घोडके गुरुजींकडून गायनाचे धडे घेतल्याचं सांगण्यात येतं.

रेखा कामत यांची गाजलेली नाटकं

ऋणानुबंध, संगीत एकच प्याला, गंध निशिगंधाचा, गोष्ट जन्मांतरीची, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझे आहे तुजपाशी, दिल्या घरी तू सुखी राहा, प्रेमाच्या गावा जावे, मला काही सांगायचं आहे, लग्नाची बेडी, सुंदर मी होणार, संगीत सौभद्र.

रेखा कामत यांचे गाजलेले चित्रपट आणि मालिका

अगं बाई अरेच्चा!, कुबेराचं धन, गृहदेवता, लाखाची गोष्ट हे चित्रपट त्यांचे विशेष गाजले. तसंच एका लग्नाची दुसरी गोष्ट, प्रपंच, माणूस, याला जीवन ऐसे नाव, सांजसावल्या या मालिकांमध्येही त्या झळकल्या होत्या.

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमा