Join us
Daily Top 2Weekly Top 5

'खड्यात गेलं सगळं', वनिता खरातने न्यूड फोटोशूटनंतर शेअर केला नवा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 14:31 IST

मराठमोळी अभिनेत्री वनिता खरातने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली होती.

मराठमोळी अभिनेत्री वनिता खरातने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली होती. वनिताच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. आपल्या वजनाचा न्यूनगंड कुठेही न बाळगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला असल्याने तिचे सर्वत्र कौतुक झाले. त्यानंतर आता वनिताने नवा फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

वनिता खरातने नुकताच एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ती खूप कॉन्फिडंट दिसते आहे. यात तिने ब्लॅक कलरचे टीशर्ट आणि ब्लू डेनिम घातली आहे. या तिच्या फोटोत तिच्या टीशर्टवरील मेसेजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या टीशर्टवर 'खड्यात गेलं सगळंसोबत यशाची सुरूवात' असं लिहिले आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

वनिताने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला बोल्ड फोटो पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. पण अशाप्रकारचे फोटोशूट करण्यामागे एक खास कारण असल्याचे तिने तिच्या पोस्टद्वारे सांगितले होते. तिने या फोटोद्वारे एक महत्त्वाचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे तिने पोस्टसोबत लिहिले होते. आपल्या वजनाचा न्यूनगंड कुठेही न बाळगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला असल्याने तिचे सर्वत्र कौतुक झाले.

वनिताने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना त्यासोबत लिहिले होते की, मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीराचा अभिमान आहे ... कारण मी, मी आहे.

वनिता खरातच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने कबीर सिंग चित्रपटात मोलकरणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील ती मोलकरीण केवळ काहीच दृश्यांसाठी असली तरी ही मोलकरीण प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली होती. याशिवाय ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये देखील पहायला मिळते आहे.

टॅग्स :वनिता खरात