Join us
Daily Top 2Weekly Top 5

Valvi 2 : 'वाळवी'चा अनपेक्षित शेवट विसरला नसालच, आता 'वाळवी २' साठीही तयार राहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 09:53 IST

'वाळवी'चे दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा वाढदिवस आणि चित्रपटाची सक्सेस पार्टीचे नुकतेच आयोजन करण्यात आले

Valvi 2 : मराठी चित्रपटसृष्टीला सध्या अच्छे दिन आले आहेत. 'वेड' आणि 'वाळवी' या चित्रपटांना प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यश आले. वेड सिनेमानंतर आलेल्या परेश मोकाशी यांच्या 'वाळवी' या सिनेमाने तुफान यश मिळवले. चित्रपटाचे झालेले कौतुक ऐकून चित्रपटगृहातील गर्दी आणखी वाढत गेली. आता चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे वाळवीचा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी नुकतीच केली.

'वाळवी'चे दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा वाढदिवस आणि चित्रपटाची सक्सेस पार्टीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यावेळी परेश मोकाशी यांच्या पत्नी आणि सिनेमाच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी वाळवी च्या दुसऱ्या भागाची घोषणा केली. 'वाळवी २' च्या कथेवर काम करणे सुरु असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दुसऱ्या भागात नक्की काय घडते यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असणार हे नक्की.

'वाळवी' सिनेमाची कथा पाहता असा मराठीत पहिल्यांदाच असा प्रयोग झाला आहे. दिग्दर्शक परेश मोकाशी हे नेहमीच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतात. तेच त्यांनी 'वाळवी'च्या माध्यमातून केले. प्रेक्षकांनाही चित्रपट फारच पसंतीस पडला. सिनेमात सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते आणि शिवानी सुर्वे यांनी सिनेमात प्रमुख भूमिका साकारली.'वाळवी'चा शेवट बघता आता दुसऱ्या भागात नक्की काय घडते यासाठी चाहते उत्सुक असणार हे नक्की.

टॅग्स :मराठी चित्रपटपरेश मोकाशी स्वप्निल जोशीसुबोध भावे अनिता दातेशिवानी सुर्वे