सर्वत्र सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाची (zapuk zupuk movie) चर्चा आहे. अशातच आता 'झापुक झुपूक' या चित्रपटाचं एक भन्नाट गाणं 'वाजीव दादा' प्रदर्शित झालंय. पहिल्या दोन गाण्यांना मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर 'झापुक झुपूक' सिनेमातील हे खास हळदीचे गाणे सध्या कमाल करत आहे. मराठी हळदी गाण्याच्या शोधात असाल, तर हे गाणे तुमच्या लग्नाच्या प्लेलिस्टमध्ये अवश्य जोडा! मस्तीने पुरेपूर आणि उत्साह ने भरपूर असलेलं असं हे पारंपरिक उत्साहात भर टाकणार हे नक्कीच. विशेष म्हणजे या गाण्यात सूरजसह बिग बॉस मराठीमधले त्याचे सहस्पर्धक सहभागी झालेले दिसत आहेत.
'झापुक झुपूक' गाण्याची चर्चा
'वाजीव दादा' हे गाणं सूरज चव्हाण सह जुई भागवत हेमंत फरांदे आणि त्याच्या बिग बॉस सीझन पाच मधील काही कलाकारांवर म्हणजेच जान्हवी किल्लेकर, छोटा पुढारी, वैभव चव्हाण, इरिना आणि पुरुषोत्तम पाटील यांच्यावर चित्रित केलं गेलय. गाण्यात ह्या सर्वांचा कल्ला आणि एकमेकांसोबतची जुगलबंदी पहायला मिळत आहे. वाजीव दादा' ह्या गाण्याला गायक चंदन कांबळे आणि ज्ञानेश्वरी कांबळे ह्यांनी आपला आवाज दिला आहे. तर संगीतकार आणि लेखक खुद्द चंदन कांबळे हे आहेत. प्रत्येकालाच थिरकायला लावणारं हे गीत आहे.
'झापुक झुपूक' सिनेमाची भरभरून होणारी चर्चा, गाण्यांना मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि आज खुद्द मेटा च्या ऑफिस मध्ये "वाजीव दादा" हे गाणं रिलीज झालं म्हणून आपला आनंद व्यक्त करत दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, " चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये सर्वत्र उत्सुकतेच वातावरण आहे. झापूक झुपूक शीर्षक गीत आणि ट्रेलर ला पण भरभरून प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. आज माझ्या झापूक झुपूक चित्रपटाच तिसरं गाण वाजीव दादा" हे हळदीच गाण मेटा च्या सहयोगाने रिलीज केलं गेलं त्यासाठी मी आभारी आहे कारण त्यांनी मराठी चित्रपटाच्या ह्या गाण्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सहकार्य केलं आहे. जिओ स्टुडिओज तर बाईपण भारी देवा पासूनच माझ्या सोबत माझ्या पाठीशी खंबीरपणे माझी साथ देतोय”.
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" हा सिनेमा येत्या २५ एप्रिल २०२५ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे !!