Join us
Daily Top 2Weekly Top 5

उर्मिला कोठारेच्या बकेट लिस्टमधील 'ही' इच्छा झाली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 15:34 IST

बकेट लिस्टमधील अभिनेत्री उर्मिला कोठारेची एक इच्छा पूर्ण झाली आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात बकेट लिस्ट असते. या बकेट लिस्टमध्ये वस्तू, व्यक्ती आणि बऱ्याच गोष्टी असतात. अशीच बकेट लिस्टमधील अभिनेत्री उर्मिला कोठारेची एक इच्छा पूर्ण झाली आहे. कोणती इच्छा असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना... उर्मिलाला शालेय जीवनापासून बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितला भेटायचे होते आणि तिची ही इच्छा नुकतीच पूर्ण झाली आहे. ही गोष्ट तिने स्वतः इन्स्टाग्रामवर सांगितली आहे.

माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला चित्रपट '१५ ऑगस्ट'च्या एका कार्यक्रमात उर्मिलाला माधुरी दीक्षितला भेटणे शक्य झाले. उर्मिलाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोत अभिनेता आदिनाथ कोठारे, माधुरी दीक्षितचा नवरा श्रीराम नेने, माधुरी दीक्षित आणि उर्मिला दिसते आहे. हा फोटो शेअर करून उर्मिलाने म्हटले की, 'माझ्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली. माधुरी दीक्षितला भेटून खूप छान अनुभव मिळाला. माझ्या शालेय जीवनापासून माधुरीला लांबून भेटण्याचे माझे स्वप्न होते. मात्र ही संधी मला मिळाली. तिच्यासोबत मी हात मिळविला आणि गप्पाही मारल्या. '

 

माधुरी दीक्षित निर्मित '१५ ऑगस्ट' चित्रपटात उर्मिलाचा नवरा म्हणजेच अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

टॅग्स :उर्मिला कानेटकर कोठारेमाधुरी दिक्षितआदिनाथ कोठारे