Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेनं निरोप घेतल्यानंतर अभिनेत्री झाली भावुक; शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 13:25 IST

'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतील अपर्णा म्हणजेच शीतल कुलकर्णीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

अल्पावधीच प्रेक्षकांची मने जिंकेलेल्या 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेनं नुकताच निरोप घेतला. मालिकेचा शेवटचा एपिसोडही नुकताच दाखण्यात आल्यानं मालिकेतील कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतील अपर्णा म्हणजेच शीतल कुलकर्णीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

शीतल कुलकर्णीने फोटो शेअर करुन लिहीलंय की,'आज माझ्या मालिकेचा शेवटचा भाग तुम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीवर म्हणजेच ‘स्टार प्रवाह’ वर बघितला असेलच..शेवटचा भाग हे म्हणताना अत्यंत त्रास होतो आहे... पण प्रवास म्हंटलं कि तो एका ठिकाणी पोहचून थांबतोच...सुरुवातीपासूनच तुम्ही या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांवर मनापासून प्रेम केलेत आणि ते आमच्या पर्यंत पोहचल'. 

पुढे ती म्हणाली, 'त्यातील माझ्या ‘अपर्णा कानिटकर’ उर्फ ‘पन्ना’ ही व्यक्तिरेखा रोज ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून तुमच्यापर्यंत पोहचली….आणि तुम्ही पन्नाला आपलंस हि केलेत व तेवढेच प्रेम हि दिलेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातील हि रांगोळी तुमच्या प्रेमरूपी रंगानी भरून व बहरून गेली...त्यासाठी तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार ..तुमचे प्रेम असेच राहू दे..लवकरच भेटू ……प्रेम व शुभेच्छा अशाच राहू दे'.

मालिकेतील सर्वांचे आवडते पात्र म्हणजे अपर्णा. अभिनेत्री शीतल कुलकर्णीनेते उत्कृष्टरित्या पार पाडलेले. एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित ही मालिका प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली. आपली आवडती मालिकेने निरोप घेतल्याने मालिकेचे प्रेक्षकही भावूक झाले आहेत. ठिपक्यांची रांगोळी मालिका संपल्यावर स्टार प्रवाहवर नवीन मालिका सुरु होत आहे. तिचं नाव लक्ष्मीच्या पावलांनी. २० नोव्हेंबरपासुन रात्री ९.३० वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर सुरु होईल.

टॅग्स :स्टार प्रवाहमराठी अभिनेताटिव्ही कलाकार