Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! अभिनय बेर्डेसोबत 'Bigg boss 15' मधील ही अभिनेत्री शेअर करणार स्क्रीन, मराठीत करणार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 17:15 IST

मराठी सिनेमातील चॉकलेट बॉय अभिनय बेर्डे हिंदी बिग बॉस सीझन 15मधील अभिनेत्री मराठीत पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.

रूपेरी पडद्यावर आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांची मने जिंकून घेणारा अभिनेता म्हणजे अभिनय बेर्डे. अभिनय लवकरच 'मन कस्तुरी रे' या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात हिंदी बिग बॉस सीझन 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.  अभिनय आणि तेजस्वी ही फ्रेश जोडी असलेल्या ‘मन कस्तुरी रे’ या सिनेमाचे पोस्टर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोशल मिडीयावर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये समुद्र किनारी स्कुटवरवर अभिनय आणि तेजस्वी यांचा रोमँटिक अंदाज दिसून येत आहे आणि त्यांचा हा लूक सोशल मिडीयावर लक्ष वेधून घेत आहे. ‘’जसा पोस्टरचा लूक फ्रेश आहे, तसाच फ्रेश लूक संपूर्ण सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा एक युथफुल सिनेमा आहे”, असं दिग्दर्शक संकेत माने यांनी सांगितले आहे. संकेत माने याचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा आहे.

ती सध्या काय करते, अशी ही आशीकी आणि रम्पाट नंतर अभिनयच्या नव्या रोमँटिक सिनेमाची त्याच्या फॅन्सना उत्सुकता आहे. तर, मुळची मराठी असलेल्या तेजस्वीनीने गेली अनेक वर्षे संस्कार -धरोहर अपनों की, स्वरांगिनी जोडे रिश्तों के सूर, पहरेदार पिया की, सिलसिला बदलते रिश्तों का आणि त्यानंतर बिग बॉस 15 मधून प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. आता तेजस्वी मराठी सिनेमात दिसून येणार आहे.

 लवकरच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर येईल. या सिनेमाचे संगीतही खास असेल, टाईम्स म्युझिक या सिनेमाशी जोडले गेले आहेत. इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट अ‍ॅन्ड आर्टस, वेंकट आर. अट्टीली आणि मृत्यूंजय किचंबरे यांनी या सिनेमाची निर्मीती केली आहे. प्रेमाची एक अनोखी कहाणी मांडणा-या या सिनेमाचे चित्रीकरण संपूर्णपणे मुंबईत झाले आहे.  

टॅग्स :तेजस्वी प्रकाशअभिनय बेर्डे