Join us

मनसेच्या वर्धापनदिनी तेजस्विनीची पोस्ट, राज ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाली, "१८ वर्ष..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 11:43 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनी तेजस्विनीने खास पोस्ट शेअर केली आहे. तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन राज ठाकरेंचा जुना फोटो शेअर करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं. तेजस्विनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अभिनयाबरोबरच ती तिच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. समाजातील आणि आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल ती सोशल मीडियाद्वारे अगदी परखडपणे तेजस्विनी तिचं मत व्यक्त करताना दिसते. यामुळे अनेकदा ती चर्चेतही आली आहे. 

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनी तेजस्विनीने खास पोस्ट शेअर केली आहे. तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन राज ठाकरेंचा जुना फोटो शेअर करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये ती म्हणते, "१८ वर्ष जिद्द आणि चिकाटीची...पुढील वाटचालीस नेहमीप्रमाणे शुभेच्छा." तेजस्विनीने राज ठाकरे आणि मनसेसाठी केलेली ही पोस्ट चर्चेत आहे. 

याआधीही अनेकदा तेजस्विनीने तिच्या सोशल मीडियावरुन राजकीय पोस्ट केल्या होत्या. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दलही तिने उघडपणे भाष्य केलं होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोल संदर्भातील व्हिडिओ शेअर करत पोस्ट केल्यामुळे तेजस्विनी चर्चेत होती. "राजसाहेब मुख्यमंत्री नाहीत, हे आपलं दुर्देव आहे" असंही तेजस्विनी म्हणाली होती.

टॅग्स :तेजस्विनी पंडितराज ठाकरेमनसे