Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गुमराह तो वो है, जो घर से…', तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 12:05 IST

तेजस्विनीने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

तेजस्विनी पंडित ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका, चित्रपटांतही काम केलं आहे. अभिनयाबरोबर सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणाऱ्या तेजस्विनीचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. तेजस्विनी तिच्या बेधडक व्यक्तिमत्वासाठीदेखील ओळखली जाते. समाजातील अनेक मुद्द्यांवर ती अगदी परखडपणे तिचं मत मांडताना दिसते. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

तेजस्विनीने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.  तेजस्विनीने उर्दू भाषेतीली शायर मिर्झा गालिब यांच्या एका प्रसिद्ध शायरीचा फोटो पोस्ट केला. तिने लिहले, 'मंज़िल मिलेगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है, जो घर से निकला ही नहीं!'.  

शिवाय तिने कॅप्शनमध्ये 'अजिबात प्रयत्न न करण्याऐवजी प्रयत्न करा आणि अयशस्वी झाला तरी हरकत नाही'. तसेच तिने #keepquestioning #tozindahotum #iykyk असे हॅशटॅगही या पोस्टमध्ये दिले आहेत. हीच पोस्ट तिने ट्विटरवरही केली आहे. यावर युजर्संनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

गुलाबाची कळी बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी तेजस्विनी निरनिराळ्या कारणांमुळे ती चाहत्यांमध्येही चर्चेत असते. यापुर्वी तिने संसदेतील खासदारांच्या निलंबनावर पोस्ट केली होती. तर तिने टोलवसुलीच्या मुद्दयावर थेट भाष्य केलं होतं. तेजस्विनी अभिनयाशिवाय ती निर्मिती क्षेत्रातही उतरली आहे. 'बांबू' हा तिचा पहिलाच निर्मित चित्रपट आहे. तेजस्विनी 'तू ही रे', 'येरे येरे पैसा', 'अगं बाई अरेच्चा', 'फॉरेनची पाटलीण' या चित्रपटांत ती झळकली. 'मी सिंधुताई सकपाळ' या चित्रपटातील तिच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं होतं.

टॅग्स :तेजस्विनी पंडितमराठी अभिनेतासामाजिकसेलिब्रिटी