Join us

डाएटसाठी नाही तर 'या' एका व्यक्तीसाठी तेजस्विनी पंडितने सोडला वडापाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 17:05 IST

Tejaswini pandit:सध्या सोशल मीडियावर तेजस्विनीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ना ना प्रकारचे डाएट, वर्कआऊट करत असतात. यात खासकरुन अनेक अभिनेत्री स्वत:ला मेंटेन ठेवण्यासाठी बाहेरचे तेलकट, तुपकट पदार्थ, फास्ट फूड असे पदार्थ आवर्जुन टाळतात. परंतु, मराठी कलाविश्वात अशी एक अभिनेत्री आहे जिने स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नव्हे तर एका खास व्यक्तीसाठी वडापाव खाणं कायमचं बंद केलं.

मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित (Tejaswini pandit). मी सिंधूताई सकपाळ,अग्गंबाई अरेच्चा, फॉरेनची पाटलीन अशा कितीतरी सिनेमांमध्ये भूमिका करुन तेजस्विनीने लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे तेजस्विनीने तिच्या एका जवळच्या व्यक्तीसाठी कायमस्वरुपी वडापाव खाणं बंद केलं आहे. 'प्लॅनेट मराठी'च्या 'पटलं तर घ्या' या टॉक शोमध्ये तिने याविषयी भाष्य केलं.

'घर भाडं नको त्या बदल्यात..'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीकडे घरमालकाने केली होती शरीरसुखाची मागणी

"माझा एक मित्र आहे जो आता हयात नाहीये. त्याच्यासाठी मी खरंच वडापाव खाणं सोडून दिलंय. तर.. आता याक्षणी मला भूक लागलीये पण मला वडापाव नाही खायचाय", असं तेजस्विनी म्हणाली.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर तेजस्विनीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तेजस्विनी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मालिका, सिनेमा आणि वेब सीरिज अशा अनेक माध्यमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच तिची रानबाजार ही सीरिज प्रदर्शित झाली. या सीरिजमध्ये तिने दिलेल्या बोल्ड सीनची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. 

टॅग्स :तेजस्विनी पंडितसेलिब्रिटीसिनेमा