Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेजश्री प्रधानला व्हायचं होतं कौन्सिलर पण..; अभिनेत्रीचं शिक्षण किती झालंय माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 14:08 IST

Tejashri pradhan:२०१० मध्ये तेजश्रीने 'झेंडा' या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर 'ह्या गोजिरवाण्या घरात' या मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावरही एन्ट्री केली.

'होणार सून मी या घरची' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान (Tejashri pradhan). पहिल्याच मालिकेतून तेजश्रीने तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. तेजश्रीने या मालिकेनंतर काही सिनेमांमध्येही काम केलं. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते.सध्या चाहत्यांमध्ये तिच्या शिक्षणाची चर्चा रंगली आहे.

२०१० मध्ये तेजश्रीने 'झेंडा' या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर 'ह्या गोजिरवाण्या घरात' या मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावरही एन्ट्री केली. मात्र, तिला खरी ओळख होणार सून मी या घरची या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेत तिने एका बँकरची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे होणार सून मी या घरची या मालिकेत तेजश्रीने बँकेत काम करणाऱ्या जान्हवीची व्यक्तीरेखा साकारली होती. अभ्यासू, मन लावून काम करणारी आणि प्रामाणिक अशी जान्हवीची व्यक्तिरेखा होती. परंतु, खऱ्या आयुष्यात तेजश्रीने एका वेगळ्याच क्षेत्रात शिक्षण घेतलं आहे.किती शिकलीये तेजश्री?

तेजश्रीने डोंबिवलीमधील चंद्रकांत पाटकर विद्यामंदिर येथून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने एनआयआयटीचा कोर्स केला. तेजश्रीला कौन्सिलर व्हायचं होतं. त्यामुळे तिने एसवायपर्यंत सायकॉलॉजीचं शिक्षण घेतलं. परंतु, त्यानंतर तिला अभिनयात पहिला ब्रेक मिळाला आणि तिने कॉलेज अर्ध्यावर सोडून मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. मालिकांच्या शुटिंगमुळे तिला कॉलेज पूर्ण करता येत नव्हतं. त्यामुळे तिने सायकॉलॉजी अर्ध्यावर सोडलं. त्यानंतर वझे केळकर कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्समध्ये पदवी घेतली. तेजश्रीने जर्मन भाषेच्या तीन लेवलच्या परिक्षाही दिल्या आहेत.

दरम्यान,तेजश्रीने तुझं नी माझं घर श्रीमंताचं, 'लेक लाडकी या घरची', 'अग्गबाई सासूबाई'  या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच चित्र, शर्यत, उदय, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या सिनेमांमध्ये काम केलंय. इतंकच नाही तर तिने प्रशांत दामले यांच्यासोबत 'कार्टी काळजात घुसली',  'मैं और तू' या नाटकांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :तेजश्री प्रधान सेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजननाटकप्रशांत दामले