Join us

पतीच्या गाण्यावर थिरकली ही अभिनेत्री, पाहा हा अफलातून व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 16:54 IST

सोशल मीडियावर सध्या याच व्हिडिओची चर्चा रंगली आहे.

ठळक मुद्देसिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला असून सध्या याच व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या व्हडिओत सिद्धार्थच्या एका गाण्यावर तन्वी ताल धरताना दिसत आहे.

जावई विकत घेणे या मालिकेतील तन्वी पालवची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या मालिकेप्रमाणेच तिने व्हॅक्यूम क्लिनर या नाटकात देखील काम केले होते. तन्वी काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. तिनेच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना ही खुशखबर दिली होती. तन्वीचे 21 डिसेंबरला दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ मेननसोबत लग्न झाले असून सिद्धार्थ हा अभिनेता असण्यासोबतच गायक देखील आहे.

सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला असून सध्या याच व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या व्हडिओत सिद्धार्थच्या एका गाण्यावर तन्वी ताल धरताना दिसत आहे. तन्वी ही खूप चांगली डान्सर असून या व्हिडिओत आपल्याला तिचा नृत्याविष्कार पाहायला मिळत आहे. या व्हिडिओसोबत सिद्धार्थने लिहिले आहे की, आम्ही इतर सामान्य जोडप्यांप्रमाणे नाही आहोत... आम्ही दोघे एकमेकांसोबत खूपच खूश आहोत.

सिद्धार्थने शेअर केलेला हा व्हिडिओ 20 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला असून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तुमची जोडी खूपच क्यूट असल्याचे त्या दोघांचे फॅन्स सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. 

सिद्धार्थने तन्वीचा फोटो शेअर करत सोशल मीडियाद्वारे लग्नाविषयी सगळ्यांना सांगितले होते. सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर तन्वीचा फोटो शेअर करत लिहिले होते की, प्रत्येक प्रेम कथा सुंदर असते... आमची कथा तर मला खूपच आवडते. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय मी घेत असून मी माझ्या जिवलग मैत्रिणीसोबत लग्न करतोय...

सिद्धार्थ हा अभिनेता असण्यासोबतच थाईकुडम ब्रिज या बॅण्डसाठी त्याला ओळखले जाते. त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्याचे परफॉर्म करतानाचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात.

टॅग्स :टेलिव्हिजन