Join us

'टकाटक' गर्ल प्रणाली भालेराव झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 06:00 IST

टकाटक या मराठी चित्रपटातून अभिनेत्री प्रणाली भालेराव हिला खूप लोकप्रियता मिळाली.

टकाटक या मराठी चित्रपटातून अभिनेत्री प्रणाली भालेराव हिला खूप लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने बोल्ड सीन दिले होते. त्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. आता ती बॉलिवूड अभिनेता आर्य बब्बरसोबत काम करताना दिसणार आहे. ही एक वेबसीरिज आहे आणि या सीरिजचे सध्या शूटिंग सुरू आहे. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे.

प्रणाली भालेराव सोशल मीडिया इंस्टाग्रामवर खूप सक्रीय आहे. ती फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच ती तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना या माध्यमातून देत असते.

नुकतेच तिने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सोशल मीडियावर सांगितले आहे. ती आर्य बब्बरसोबत एका हिंदी वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजचे शूटिंग सध्या सुरू आहे. तिने शूटिंगदरम्यान आर्य बब्बरसोबतचे सेटवरील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्रणालीने फोटो शेअर करत लिहिले की, ‘…आणि आम्ही चित्रीकरण सुरू केले’

 प्रणालीच्या पहिल्याच ‘टकाटक’ या सिनेमात प्रथमेश परब, रितीका श्रोत्री आणि अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आपल्या या पहिल्याच भूमिकेतूनही तिने ती किती चांगली अभिनेत्री आहे ते प्रेक्षकांना दाखवून दिले होते.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून अभिनय विश्वात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री प्रणाली भालेरावने मराठी सिनेइंडस्ट्रीतही आपले स्थान निर्माण केले आहे.अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी प्रणाली मॉडेलिंग करत होती.

टॅग्स :टकाटकप्रथमेश परब