Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बागेत बाग राणीची बाग" म्हणत स्वप्नाली पाटीलने आस्तादसाठी घेतला भन्नाट उखाणा, तुफान होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 11:19 IST

सध्या या लग्न सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे लग्नातील एका खास विधीने. प्रत्येक लग्नामध्ये वर आणि वधू उखाणा घेतात. याला कलाकारही अपवाद नाहीत.

अखेर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले कपल अभिनेत्री स्वप्नाली पाटील आणि आस्ताद काळे  लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.व्हॅलेन्टाइन डेच्या मुहूर्तावर रजिस्टर पद्धतीनं या दोघांनी लग्न केले आहे.  

 

 

मेहंदीपासून ते लग्नापर्यंतच सगळेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहतेही दोघांच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सध्या या लग्न सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे लग्नातील एका खास विधीने. प्रत्येक लग्नामध्ये वर आणि वधू उखाणा घेतात. याला कलाकारही अपवाद नाहीत. 

 स्वप्नालीने आस्तादसाठी उखाणा घेतला.  तिच्या चेहऱ्यावर उखाणा घेतानाचा आनंद स्पष्टपणे पाहायला मिळतोय. त्याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 'बागेत बाग राणीची बाग, आस्तादचा राग म्हणजे धगधगणारी आग' असा हटके उखाणा घेत स्वप्नालीनं उपस्थितींची मनं जिंकली. आपल्या जोडीदारावरील प्रेम व्यक्त करण्याचा स्वप्नालीचा अंदाज लयभारी आणि हटके म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.त्यांच्या या व्हिडीओ चाहत्यांची तुफान पसंती मिळत आहे.या दोघांना शुभेच्छा देण्यासाठीलग्नाला मराठी सिनेसृष्टीतील मेघा धाडे उपस्थित होती.

अभिनेत्री स्वप्नाली पाटीलसोबतच्या रिलेशनशिपची कबुली त्याने बिग बॉस मराठीमध्ये दिली होती. आस्तादच नाही तर स्वप्नालीनेही हे मान्य केले आहे. आस्ताद आणि स्वप्नालीने पुढचे पाऊल या मालिकेत त्याच्यासोबत काम केले होते.  या मालिकेत स्वप्नालीची एंट्री झाल्यानंतर या दोघांची मैत्री झाली आणि काहीच महिन्यात आस्ताद स्वप्नालीच्या प्रेमात पडला. ते दोघे अनेक वर्षांपासून नात्यात असल्याचे म्हटले जात होते. अखेर मराठी बिग बॉसमध्ये आस्तादने आपल्या प्रेमाची कबुली देत दोघेही प्रेमात असल्याचे पहिल्यांदाच जाहीर केले होते.

विशेष म्हणजे आस्तादने स्वप्नालीला प्रपोज केले नाही. मात्र मनात काय हे बोललेच पाहिजे असा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे स्वप्नालीला त्याने तू मला आवडतेस असे सांगितले... त्यावर या गोष्टीचा विचार करू दे असे उत्तर स्वप्नालीने त्याला दिलं आणि जवळजवळ वर्षभरानंतर होकार कळवला होता. सध्या स्वप्नाली स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत झळकत आहे. तर आस्ताद चंद्र आहे साक्षीला या मालिकेत काम करत आहे.

टॅग्स :अस्ताद काळेस्वप्नाली पाटील