Join us

नाना पाटेकरांच्या समर्थनात कलाकार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 17:25 IST

अभिनेते नाना पाटेकर यांना पुण्यातील कलाकारांनी पाठिंबा देवून त्यांचे समर्थन केले आहे.

अभिनेते नाना पाटेकर यांना पुण्यातील कलाकारांनी पाठिंबा देवून त्यांचे समर्थन केले आहे. मराठी कलाकारावर होणारा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी नाना पाटेकर यांच्यावर केलेले कथित केलेले आरोप केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केले आहेत. जर खरेच त्यांच्यावर अन्याय झाला होता. तर त्यांनी सर्वप्रथम पोलिसात तक्रार दाखल करायला हवी होती. त्यांनी न्याय देवतेकडे न्याय मागायला हवा होता त्यांनी तसे न करता त्या थेट माध्यमात गेल्या व आपली भूमिका मांडली. म्हणून त्यांनी केलेले आरोप संशयास्पद आहेत, असे प्रतिपादन समस्त कलाकारांनी सारसबाग येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रात केले.

वेळी निर्माते-दिग्दर्शक शरद गोरे, दिग्दर्शक जितेंद्र वाईकर, अभिनेते प्रकाश धिंडले, मारुती चव्हाण, अभिनेत्री माधवी गोडांबे, वनिता सोनवणे, मयुरी भालेराव, रमाकांत सुतार, पंकज भालेराव, महेश शिंदे, कुणाल निंबाळकर, मयुर जोशी, मंगेश घोडके आदी कलाकार यावेळी उपस्थित होते. यावेळी कलाकारांनी नानाच्या समर्थनात घोषणा दिल्या ‘लेना ना देना’ ‘अडकवले आमचे नाना’.मातृदेवो भव ही आपली संस्कृती आहे. महिला ह्या आम्हाला पूजनीय आहेत प्रत्येक पीडित महिलेला न्याय मिळाला पाहिजे. ही आमची भूमिका आहे. गेल्या चार दशकापासून आपल्या कलेद्वारे चित्रपट आपले अढळस्थान निर्माण करणारे महानायक नटसम्राट नाना पाटेकर हे कलाकार म्हणून सर्वज्ञात आहेत. नाम फाउंडेशन तर्फे त्यांनी समाजहिताची कामे केली आहेत. नाना पाटेकर यांच्यावर चालू असलेली मीडिया ट्रायल त्यातून होत असणारी मानहानी कृपया थांबवावी व न्याय पालिकेला आपले काम निरपेक्षपणे करून द्यावे अशी भूमिका समस्त कलाकारांच्या वतीने मांडण्यात आली.

 

टॅग्स :नाना पाटेकरमीटू