Join us

सनी लिओनी पडली 'नवरोबा'च्या प्रेमात; 'कन्नी'मधील गाण्यावर केला जबरदस्त डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 17:01 IST

Sunny leone: सनीने इन्स्टाग्रामवर 'कन्नी' सिनेमातील गाण्यावर डान्स केला आहे.

सनी लिओनी (Sunny Leone) हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी आता नवीन राहिलेलं नाही. गेल्या काही वर्षांमध्ये सनी लिओनीमध्ये बराच बदल झाला असून तिने बॉलिवूडमध्ये तिचं स्थान निर्माण केलं आहे. सनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम नवनवीन ट्रेंडिंग गाण्यावर रिल्स शेअर करत असते. विशेष म्हणजे यावेळी तिला चक्क एका मराठी गाण्याची भूरळ पडली असून तिने या गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठी कलाविश्वात सध्या हृता दुर्गुळे आणि शुभंकर तावडे यांच्या कन्नी या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, त्यापूर्वी रिलीज झालेल्या ट्रेलर आणि टीझरने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. यात सध्या या सिनेमातील नवरोबा हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड होतंय. या गाण्याच्या प्रेमात चक्क सनी लिओनी पडली असून तिने या गाण्यावर रील शेअर केलं आहे.

'कन्नी' या चित्रपटाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर आणि गाण्यांनी अनेकांना वेड लावले आहे. प्रत्येक गाण्याचा जॉनर वेगळा असून सगळ्याच गाण्यांवर संगीतप्रेमी प्रेम करत आहेत. यातील विशेष गाजलेले गाणे म्हणजे 'नवरोबा'. या गाण्यावरील अनेक रील्स सध्या व्हायरल होत आहेत. यातील हूकस्टेपही प्रचंड गाजत आहे आणि याचीच भुरळ बॉलिवूडच्या सनी लिओनीला पडली आहे. 'नवरोबा' गाण्यावरील सनीचे हे नृत्य सोशल मीडियावर प्रचंड गाजतेय. सनी हे गाणे एन्जॉय करतेय,असे एकंदर तिच्या चेहऱ्यावरून दिसतेय. 

दरम्यान, सनीने तिच्या इन्स्टग्रामवर कन्नी सिनेमातील नवरोबा या गाण्यावर डान्स केला आहे. सोबतच या सिनेमाला शुभेच्छादेखील दिल्या आहेत. हा सिनेमा येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात ऋता दुर्गुळे, अजिंक्य राऊत, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

टॅग्स :सनी लिओनीसिनेमासेलिब्रिटीऋता दूर्गुळे