Join us

Subodh Bhave : सुबोध भावेचा मुंबई मेट्रोतून प्रवास, ट्रॅफिकपासून सुटका झाल्याचा व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 17:06 IST

मराठी अभिनेता सुबोध भावेनेही बायकोसोबत मेट्रो प्रवासाचा आनंद लुटला आहे.

Subodh Bhave :  नव्यानेच सुरु झालेली मेट्रो (Mumbai Metro) म्हणजे मुंबईकरांसाठी खास गिफ्टच आहे. मेट्रो मुळे मुंबईकरांची ट्रॅफिकपासून सुटका होणार आहे. फक्त सामान्य नागरिक नाही तर सेलिब्रिटीही ट्रॅफिकला कंटाळले आहेत. मराठी अभिनेता सुबोध भावेनेही बायकोसोबत मेट्रो प्रवासाचा आनंद लुटला आहे. मेट्रोतून प्रवास करतानाचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

नुकतंच मुंबईतील नव्या मेट्रो मार्गिकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. अंधेरी ते दहिसर असा हा मार्ग आहे. सर्वसामान्यांसाठी मेट्रोचे दरवाजे उघडल्याने सर्वच खूश आहेत. सुबोधनेही याचे कौतुक करत व्हिडिओ पोस्ट केला आहे. तो म्हणतो, 'नमस्कार मी आता मुंबई मेट्रोतून प्रवास करतोय. माझी पत्नीही माझ्यासोबत आहे. आमचा पहिला प्रवास आहे. खूप छान वाटतंय.कांदिवली वरुन बिंबीसार येथे या माझ्या घराजवळ आम्ही अगदी १५ मिनिटात पोहोचू.आता ट्रॅफिकमध्ये अडकायची भीती नाही. तर नक्की यातून प्रवास करा आपल्याच सोयीसाठी आहे. फार अमेझिंग आहे. मुंबई मेट्रोचे आभार.'

तो पुढे म्हणाला, मुंबई मेट्रो शहराला जोडणारी आहे. दूरवर राहणाऱ्या लोकांसाठी खूपच लाभदायक आहे. कधी मेट्रो सुरु होते असं आपल्या सर्वांना झालं होतं. आता प्रार्थना करतो इतरही मेट्रो लाईन लवकरात लवकर सुरु व्हाव्या.'

सुबोधचा 'वाळवी' सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. ज्यांनी वाळवी अजुन बघितला नाही त्यांनी नक्की बघा असंही तो व्हिडिओत म्हणाला. परेश मोकाशी यांच्या वाळवी सिनेमाला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. सिनेमाचे शो देखील वाढले आहेत. सिनेमात स्वप्नील जोशी, अनिता दाते आणि शिवानी सुर्वे यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :सुबोध भावे मुंबईमराठी अभिनेतामेट्रो