Join us

सुबोध भावेने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना दिला हा कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 13:21 IST

अभिनेता सुबोध भावे सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तसेच तो सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. याशिवाय आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असतो. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोतून त्याने आपल्या चाहत्यांना कानमंत्र दिला आहे.

सुबोध भावे याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे आणि म्हटले की, कासवाच्या गतीने का होईना पण आपलं लक्ष्य गाठलंच पाहिजे. सुबोध भावेच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

'कट्यार काळजात घुसली' या अजरामर संगीत नाटकावर तितकाच उत्तम चित्रपट अभिनेता सुबोध भावेने दिग्दर्शित केला. या चित्रपटाला मिळाळेल्या अभूतपूर्व यशानंतर आता सुबोध भावे 'संगीत मानापमान' हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर घेऊन येतो आहे. या चित्रपटाचे नाव 'मानापमान' असून हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीत प्रदर्शित केला जाणार आहे.

सुबोधने आज मराठी चित्रपटसृष्टीत त्याची एक खास जागा निर्माण केली आहे. तो एक खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक देखील आहे. त्याने मराठीसोबत हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सुबोध भावे आपल्या ‘कान्हाज मॅजिक’ या निर्मिती संस्थेद्वारे ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेची निर्मिती केली आहे.

टॅग्स :सुबोध भावे इन्स्टाग्राम