Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्मिता गोंदकरने शेअर केला जुना फोटो, तिच्या फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 17:13 IST

'बिग बॉस मराठी' सीझन 1 मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले.

 

'बिग बॉस मराठी' सीझन 1 मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले. 'पप्पी दे पारुला' म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अ‍ॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. स्मिताने नुकताच सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहेत. हा स्मिताचा जुना फोटो आहे. हा फोटो शेअर करत स्मिताने म्हटलं की मिळालेल्या वेळेत माझे जुने फोटोग्राफ्स पाहते. माझे सर्वात पहिलं फोटोशूट. जुन्या आठवणी.

स्मिताला नेहमी वेगवेगळ्या भूमिका व गोष्टी करायला आवडतात.कलाकारांनी स्वतःमध्ये बदल करत नवनवीन गोष्टी करायला पाहिजेत.

माझे तर हॉलिवूडमध्ये काम करायचे स्वप्न आहे. हे माझे खूप आधीपासूनचे स्वप्न आहे आणि लवकरच मी खूप मेहनत करून आणि प्रामाणिकपणे काम करून हे स्वप्न सत्यात पूर्ण करणार आहे, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

टॅग्स :स्मिता गोंदकरबिग बॉस मराठी