Join us

२३ दिवसांत ४ देश फिरले सिद्धार्थ आणि मिताली; फोटो शेअर करत अभिनेता म्हणतो- "आता घरचे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 15:20 IST

सिद्धार्थ-मिताली अनेकदा परदेसवारी करत असतात. आतादेखील ते युरोपात फिरायला गेले आहेत. याचे फोटो गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहायला मिळत आहेत.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. सिद्धार्थ-मितालीची जोडी कलाविश्वात हिट आहे. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांचं फॅन फॉलोविंगही मोठं आहे. सिद्धार्थ-मिताली चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अपड्टेस देत असतात. सध्या सिद्धार्थ आणि मिताली लाँग व्हॅकेशनवर आहेत. 

मराठी सिनेसृष्टीतील या कपलला फिरण्याची प्रचंड आवड आहे. सिद्धार्थ-मिताली अनेकदा परदेसवारी करत असतात. आतादेखील ते युरोपात फिरायला गेले आहेत. याचे फोटो गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहायला मिळत आहेत. आतादेखील सिद्धार्थने त्यांच्या व्हॅकेशन टूरमधील एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमधून त्याने २३ दिवसांत तब्बल ४ देश फिरल्याचं म्हटलं आहे. "१६ जागा, ४ देश, २३ दिवस आणि अगणित आठवणी...अजून फिरायचंय पण घरचं जेवण आठवतंय! आलोच!", असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. 

सिद्धार्थने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'अग्निहोत्र' या मालिकेने त्याला ओळख मिळवून दिली. 'गुलाबजाम', 'क्लासमेट्स', 'ऑनलाईन बिनलाईन', 'श्रीदेवी प्रसन्न', 'बस स्टॉप', 'रणांगण', 'सतरंगी रे', 'झेंडा' अशा सिनेमांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. मितालीदेखील कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'फ्रेशर्स' या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. 'उंच माझा झोका', 'लाडाची मी लेक गं' या मालिकांमध्ये ती दिसली. 'उर्फी', 'आम्ही बेफिकर' या सिनेमांमध्येही ती झळकली आहे.   

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकरटिव्ही कलाकारमराठी अभिनेता