Join us

"मी आणि मोहन २ वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलो", शुभांगी गोखले यांचा खुलासा, म्हणाल्या- "२०-२५ वर्ष आधी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 10:15 IST

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शुभांगी यांनी त्यांचं अभिनयातील करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं. त्याबरोबरच सखीच्या लग्नाआधीच्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या निर्णयाबाबतही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. 

शुभांगी गोखले या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. मराठीबरोबरच काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे. शुभांगी यांच्याप्रमाणेच त्यांची लेक सखी गोखलेदेखील कलाविश्वात आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शुभांगी यांनी त्यांचं अभिनयातील करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं. त्याबरोबरच सखीच्या लग्नाआधीच्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या निर्णयाबाबतही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. 

सखी गोखले आणि सुव्रत जोशी लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहत होते. त्याबाबत शुभांगी गोखले यांना 'आरपार' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना शुभांगी गोखले यांनी मोहन गोखलेंसोबत लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहिल्याचा खुलासा केला. त्या म्हणाल्या, "२०-२५ वर्ष आधी मी आणि मोहन दोन वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलो. त्याच्या मागे एक छोटंसं कारण होतं. खूप वर्षांनी मोहनचं मिस्टर योगी येणार होतं. काहीतरी मोठं घडावं असं त्याला वाटत होतं. कोण आहे हिचा नवरा तर हा आहे असं..आणि मलाही असं वाटत होतं की मी एवढं शिक्षण घेऊन धडपड करून इथे मुंबईत आलीये. माझ्या भावाकडे राहतेय तर मलाही माझं काहीतरी अस्तित्व हवं. पटकन लग्न केलं असं नको". 

"तेव्हा माझं आत्मकथा सुरू होतं. मिस्टर योगी २ डिसेंबरला आलं. ती सिरियल संपली आणि मग आम्ही १० डिसेंबरला लग्न केलं. त्यामुळे मला सखीच्या बाबतीत असं काही प्रॉब्लेम नव्हता. ते दोघं पुण्याला माझ्याच घरी राहणार होते. तेव्हा मला सखी म्हणाली की आम्ही दोघे शिफ्ट होतोय. तेव्हा मी तिला म्हणाले की ठीक आहे. पण, हे कायम असणार असेल तरच", असं त्या म्हणाल्या.

टॅग्स :सखी गोखलेटिव्ही कलाकार