Join us
Daily Top 2Weekly Top 5

'संगीत मानापमान'मधील 'वंदन हो' गाणं भेटीला! शंकर महादेवन-राहुल देशपांडे-महेश काळेंच्या स्वरांचा श्रवणीय साज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 14:16 IST

'संगीत मानापमान' ह्या चित्रपटावरूनच यात संगीताची मजेशीर मेजवानी असल्याचं लक्षात येत. आणि याचीच सुरवात आज चित्रपटाच्या पहिल्या "वंदन हो" गाण्याने झाली आहे. 

सध्या 'संगीत मानापमान' या मराठी सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. कट्यार काळजात घुसली या सिनेमानंतर एक संगीतमय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळेच 'संगीत मानापमान' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आता या सिनेमातील वंदन हो हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'संगीत मानापमान' ह्या चित्रपटावरूनच यात संगीताची मजेशीर मेजवानी असल्याचं लक्षात येत. आणि याचीच सुरवात आज चित्रपटाच्या पहिल्या "वंदन हो" गाण्याने झाली आहे. 

कट्यार काळजात घुसली नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना संगीत विश्वातील दिग्गज संगीतकार शंकर महादेवन, गायक महेश काळे आणि राहुल देशपांडे यांचा आवाजातील तिहेरी संगम अनुभवायला मिळणार आहे. या आधीही ही सुप्रसिद्ध तिकडी एकत्र येऊन गायली होती. परंतु चित्रपटातील गाण्यासाठी एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. संगीतकार शंकर महादेवन हे "वंदन हो" या गाण्याबद्दल आपलं मत व्यक्त करत म्हणाले की, "माझं सौभाग्य आहे की मला हे गाणं राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या सोबत करायला मिळालं, नक्कीच आमच्यासाठी हे एक फेरिटेल आहे, संपूर्ण टीम जरी तीच असली तरी आमचं म्युझिक मात्र खूप वेगळं आहे. सुबोध भावे दिग्दर्शित या चित्रपटात अजून भरपूर अप्रतिम गायक आहेत, समीर सावंत यांनी लिरिक्स सिनेमाच्या गाण्याला दिले आहेत त्यामुळे प्रेक्षकांना ही संगीतमय भेट नक्कीच आवडेल."

राहुल देशपांडे म्हणाले की " मला अतिशय आनंद झाला, कट्यारचे दिवस आठवले, शंकरजी खूप मोठे जिनिअस आहेत त्यांनी खूप छान कंपोझिशन केलय त्यामुळे मी स्वतःला खूप लकी समझतो. इतकंच नव्हे तर महेश काळे ह्यांनी सुद्धा भावना व्यक्त करत सांगितलं की "मानापमानचा हिरो म्हणजे या चित्रपटाची गाणी आहेत. मला खात्री आहे कि आमच्या कट्यारच्या ह्या संघाकडून नवीन येणारा संगीत मानापमान चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल."

'संगीत मानापमान' चित्रपटात एकूण १४ गाणी आहेत, तर ह्या गाण्यांना १८ दिग्गज गायकांनी गायले आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाला सुरेख संगीत देणारे त्यातले ७ गायक हे नॅशनल अवॉर्ड विनर गायक आहेत. त्यामुळे या चित्रपटाद्वारे सर्वश्रेष्ठ गायकांनी सजवलेली मैफिल आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना  कुलकर्णी, निवेदिता सराफ सारखे आणखी दिग्गज कलाकारांना आपण सिनेमात पाहू शकतो. येत्या १० जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :सुबोध भावे शंकर महादेवनमहेश काळेसिनेमा