Join us

Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 18:29 IST

Sairat: 'या' सीनमध्ये दिसले रिंकूचे आईवडील, बघा फोटो

Sairat: मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वात गाजलेला सिनेमा म्हणजे 'सैराट'. नागराज मंजुळे दिग्दर्शित या सिनेमाने ११० कोटींचा गल्ला जमवला होता. १०० कोटी पार जाणारा हा पहिलाच मराठी सिनेमा. या सिनेमात आकाश ठोसर, रिकू राजगुरु आणि इतर मुलांची गावातच ऑडिशन घेऊन निवड झाली होती. रिंकू या सिनेमामुळे आर्ची म्हणूनच लोकप्रिय झाली. तुम्हाला माहितीये का 'सैराट' सिनेमातील एका सीनमध्ये चक्क आर्चीचे खरे आईवडीलही दिसले होते.

'सैराट' सिनेमाला १० वर्ष होत आहेत. २०१६ साली आलेला हा सिनेमा जगभरात गाजला. ऑनर किलींग सारखा गंभीर विषय या सिनेमात मांडण्यात आला होता. या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी रिंकू फक्त सातवीत होती. तर सिनेमा रिलीज झाला तेव्हा ती नववीत होती. रिंकू मूळची अकलूजची असून तिचे आई वडील दोघंही शिक्षक आहेत. सिनेमातील एका सीनमध्ये चक्क त्या दोघांचीही झलक दिसली होती.

कोणता होता तो सीन?

आर्ची आणि परश्याचं प्रेमप्रकरण कुटुंबासमोर येतं. आर्चीच्या घरची मंडळी कडाडून विरोध करतात. तिचं लग्न लावायला निघतात. मात्र आर्ची घरातून पळून जाते. पुढे आर्ची आणि परश्या दोघंही गाव सोडून निघून जातात. तेव्हा घरचे लोक त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधून त्यांना पोलिस स्टेशनमध्ये येण्यास सांगतात. तिथे येऊन सगळ्या गोष्टी बोलू असं सांगून त्यांना बोलवून घेतात. यानंतर आर्ची पोलिस स्टेशनच्या आत जातानाचा सीन आहे. तेव्हाच बाहेर तिचे खरे आईवडीलही उभे आहेत. तर आत जाऊन ती सिनेमातील वडिलांविरोधात पोलिसांशी बोलतानाचा, आकांडतांडव करतानाचा सीन आहे. तेव्हा आर्चीचे खरे आईवडील पोलिस स्टेशनबाहेर उभे राहून त्यांना बघत आहेत असाही एक सीन दिसतो. या दोन्ही सीनमध्ये रिंकूच्या आईवडिलांची झलक दिसली आहे. 

रिंकूच्या आईचं नाव आशा आहे. मायलेकीचे अनेक फोटो सोशल मीडियावर आहेत. तर रिंकूचे वडील महादेव राजगुरु यांच्यासोबतही रिंकू फोटो पोस्ट करत असते. रिंकू कामानिमित्त मुंबईत राहते मात्र तिचं आजही गावाशी घट्ट नातं आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूमराठी अभिनेतामराठी चित्रपट