Join us

कारण मी मी आहे...! ‘सैराट’फेम तानाजी गळगुंडेनं केलं न्यूड फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 16:26 IST

‘सैराट’ सिनेमा आठवला की, पाठोपाठ आठवतात ते आर्ची-परश्या, लंगड्या, सल्या. तूर्तास चर्चा आहे ती ‘लगंड्या’ची भूमिका साकारणारा अभिनेता तानाजी गळगुंडे याची...

ठळक मुद्देसैराट प्रदर्शित झाला, आणि तानाजी प्रकाश झोतात आला. पुढे त्यानं‘सैराट’ च्या दक्षिणेकडच्या रिमेकमध्ये  दमदार काम केलं.

‘सैराट’ (Sairat) सिनेमा आठवला की, पाठोपाठ आठवतात ते आर्ची-परश्या, लंगड्या, सल्या. सिनेमातील ही पात्र आणि ही पात्र साकारणारे कलाकार तुफान लोकप्रिय ठरले. या ना त्या कारणानं सर्वांचीच चर्चा होत असते. तूर्तास चर्चा आहे ती ‘लगंड्या’ची भूमिका साकारणारा अभिनेता तानाजी गळगुंडे (Tanaji Galgunde) याची. होय, तानाजी सध्या वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. हे कारण काय तर त्याचं न्यूड फोटोशूट. होय, शरीर हे परमेश्वराची देणगी आहे आणि ते जसं आहे त्यावर आमचं प्रेमं आहे, असा संदेश तानाजीने या न्यूड फोटोशूटच्या माध्यमातून दिला आहे. (Sairat Fame Tanaji Galgunde nude photoshoot)

रावण फ्युचर प्रोडक्शनसाठी तानाजीनं हे न्यूड फोटोशूट केलं आहे. या फोटोत तानाजी गिटार घेऊन उभा आहे. ‘माझ्या पायाची रचना नीट नसेल पण माझ्या संगीताची आहे...!  माझे स्वत:चे सूर उत्कृष्ट आहेत.. कारण मी मी आहे,’असं तानाजीच्या या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.तूर्तास तानाजीच्या या खास फोटोशूटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  काही दिवसांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री वनिता खरात हिनं असंच न्यूड फोटोशूट केलं होतं. याद्वारे बॉडी शेमिंग करणाºयांची बोलतीच तिनं बंद केली होती.   

कॉलेजमध्ये शिकत असताना तानाजीचं नाव त्याच्या सरांनी नागराज मंजुळे यांना सुचवलं होतं. त्याने मग आॅडीशन्स दिल्या आणि त्याची निवड केली गेली. त्यानेही ती सार्थ ठरवली. अभिनयाचं कुठचही शिक्षण न घेता,   नागराजजी सांगत गेले, तसं तो सिनेमात काम करत गेला. त्याचं पात्र मुख्य पात्रांसारखं खूप गाजलं.

सैराट प्रदर्शित झाला, आणि तानाजी प्रकाश झोतात आला. पुढे त्यानं‘सैराट’ च्या दक्षिणेकडच्या रिमेकमध्ये  दमदार काम केलं. सैराटच्या यशानंतर तो  द कपिल शर्मा शो, ड्रामा कंपनी,  कॉमेडीची जी.एस.टी. एक्स्प्रेस, सा रे गा मा पा  यांसारख्या रियालिटी शोच्या मंचावर मिरवताना दिसला. कॉमेडीची जी.एस.टी. एक्स्प्रेस, ड्रामा कंपनी मध्ये स्कीट्सही त्याने केले होतं.  माझा अगडबम  या सिनेमात तृप्ती भोईर आणि सुबोध भावे यांच्या सोबतही त्यानं काम केलं.

टॅग्स :सैराट 2