Join us

'सपनों मे मिलती है' गाण्यावर सचिन-सुप्रिया यांचा रोमँटिक डान्स, लेकीने शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 10:12 IST

सचिन-सुप्रिया यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या लेकीने त्यांचा खास व्हिडिओ शेअर केला आहे.

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. सिनेसृष्टीतील ते रोमँटिक कपल आहेत. सचिन-सुप्रिया यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या लेकीने त्यांचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. 

सचिन-सुप्रिया यांची लेक श्रीयाने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सचिन-सुप्रिया पिळगावकर 'सपनों मे मिलती है' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओत दोघांची केमिस्ट्री आणि रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. "लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...तुम्ही जन्मालाच सुपरस्टार म्हणून आला आहात. नच बलिये सीझन १ चे विनर", असं कॅप्शन श्रीयाने या व्हिडिओला दिलं आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी १९८५ साली लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला ३९ वर्ष झाली आहेत. त्यांना श्रीया पिळगावकर ही एकुलती एक मुलगी आहे. सचिन-सुप्रिया यांनी अशी ही बनवाबनवी, माझा पती करोडपती, नवरी मिळे नवऱ्याला, आयत्या घरात घरोबा, नवरा माझा नवसाचा अशा अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्रीयादेखील कलाविश्वात तिचं नशीब आजमावत आहे. 

टॅग्स :सचिन पिळगांवकरसुप्रिया पिळगांवकरसेलिब्रिटी