Join us

'हास्यजत्रे'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी 'नाच गं घुमा' पाहून नम्रताला मोजकंच अन् महत्वाचं सांगितलं की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 11:22 IST

नम्रता संभेराव - मुक्ता बर्वेचा नाच गं घुमा सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. त्याबद्दल सचिन गोस्वामींनी नम्रताबद्दल लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे (naach ga ghuma, namrata sambherao, sachin goswami)

सध्या  'नाच गं घुमा' संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच गाजतोय. हा सिनेमा पाहायला महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षक गर्दी करत आहेत. १ मेला सिनेमा रिलीज झालाय. आणि अवघ्या काहीच दिवसांत सिनेमाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय. केवळ स्त्रिया नाही तर पुरुषही 'नाच गं घुमा' चे फॅन झाले आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सिनेमाचं कोतुक करत आहेत. अशातच महाराष्ट्रातील हास्यजत्रा शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी 'नाच गं घुमा' वर कौतुकाचा वर्षाव केलाय.

सचिन गोस्वामींनी सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलंय की, "नाच ग घुमा...पहावा तर आमच्या नमा साठी... अफलातून कामगिरी.. तुझा अभिमान वाटतो नम्रता.." अशा मोजक्या शब्दांत गोस्वामींनी नम्रताचं कौतुक केलं. आपल्या सर्वांना माहितच आहे की नम्रता गोस्वामींचं दिग्दर्शन असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय करतेय. याच नम्रताला मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच इतकी तगडी भूमिका मिळालीय.

'नाच गं घुमा'बद्दल परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' हा सिनेमा १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेरावसह या सिनेमात सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठ्ये, मायरा वायकुळ या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'नाच गं घुमा' सिनेमाने तब्बल २ कोटींचा गल्ला जमवला आहे. नम्रता - मुक्ताच्या जोडीचं प्रेक्षक कौतुक करत आहेत.

टॅग्स :नम्रता आवटे संभेरावमुक्ता बर्वेपरेश मोकाशी मराठीमहाराष्ट्राची हास्य जत्रा