Join us

इंडिया, हिंदुस्थान की भारत! रितेश देशमुखने घेतला पोल; चाहत्यांचा कौल कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 13:41 IST

India Vs Bharat : रितेश देशमुखने इंडिया की भारत? वादावर घेतला पोल, जाणून घ्या

सध्या देशभरात नाव बदलाची चर्चा सुरू आहे. मोदी सरकर देशाचं नाव बदलून भारत करण्याच्या तयारीत आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव मोदी सरकारकडून मांडण्यात येण्याची शक्यता आहे. देशाचं नाव इंडियाऐवजी भारत करण्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर सर्वच स्तरातून देशात विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. कलाविश्वातील सेलिब्रिटीही यावर व्यक्त होत त्यांचं मत मांडताना दिसत आहेत.

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनेही आता याबाबत एक ट्वीट केलं आहे. रितेशने त्याच्या ट्विटवरवरुन देशाचं नाव बदलण्याबाबत एक पोल घेतला आहे.  या पोलमध्ये त्याने १. भारत २. इंडिया ३. हिंदुस्थान आणि ४. सगळे सारखे आहेत असे चार पर्याय दिले आहेत. ट्विटरवरुन हा पोल शेअर करत रितेशने ‘तुम्हाला काय वाटतं?’ असं विचारलं आहे. २४ तासांसाठी रितेशच्या या पोलला चाहत्यांना वोट करता येणार आहे. या पोलला आत्तापर्यंत १९ हजार ८६६ लोकांनी वोट केलं आहे. आता चाहत्यांचा कौल कुणाला असणार हे पाहावं लागेल.

वडील वारले की केस कापावे लागतात, नेटकऱ्याला गश्मीरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, "टक्कल केलं असतं..."

शाहरुखच्या चित्रपटात पोलीस असलेला अभिनेता खऱ्या आयुष्यातही ‘जवान’, मॉडेलिंगसाठी सोडली सैनिकाची नोकरी

संपूर्ण देशभरातच नाव बदलण्याच्या चर्चा आहेत. सध्या सुरू असलेल्या जी२० परिषदेच्या स्नेहभोजन पत्रिकेवरही  प्रेसिडेंट ऑफ इंडियाऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला होता. त्याबरोबच पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण देत असताना त्यांच्या समोरही ‘भारत’ लिहिलेलीच पाटी होती.  मोदी सरकार १८-२२ सप्टेंबर संसदेच्या या विशेष अधिवेशनात इंडिया हे नाव बदलून भारत करण्यात येण्याचा प्रस्ताव मांडण्यात येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :रितेश देशमुखभारतमराठी अभिनेता