Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ved Marathi Movie : 'वेड' सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज होणार; चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 09:02 IST

वेडच्या टीझरला तर प्रेक्षकांनी खुप पसंत केले आहे. आता सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर आज रिलीज होत आहे.

Ved Marathi Movie : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया (Genelia) ही जोडी चर्चेत आहे आगामी 'वेड' या सिनेमामुळे. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. वेडच्या टीझरला तर प्रेक्षकांनी खुप पसंत केले आहे. अजय अतुलच्या गाण्यांना तर अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. आता सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर आज रिलीज होत आहे. आज १२ वाजता ट्रेलर प्रदर्शित होणार अशी घोषणा करण्यात आली आहे.

'वेड' सिनेमाच्या टीझरमध्ये रितेशचा गंभीर लुक, बीचवरचे शूट आणि डायलॉगने प्रेक्षकांना खरोखरच वेड लावले. त्यानंतर सिनेमाचे टायटल सॉंग आले. रितेश आणि अभिनेत्री जिया शंकर यांच्यावर हे रोमान्टिक गाणे चित्रित करण्यात आले आहे. वेड गाण्याचे म्युझिक, शूट लोकेशन आणि रितेश जियाची केमिस्ट्री बघून चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली होती. नंतर आलेले बेसुरी हे गाणेही प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे. त्यामुळे आता वेडचा ट्रेलर काय धमाका करतो हे आज कळेल.

\

Ved Marathi Movie : पुण्यात ढोल ताशाच्या गजरात 'वेड'चे प्रमोशन; रितेश जेनेलियाची विद्यार्थ्यांसोबत धमाल

वेड हा सिनेमा ३० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'वेड' हा जेनेलियाचा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे तर रितेश पहिल्यांदाच दिग्दर्शन करत आहे.

टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजा