Join us

"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 10:53 IST

प्रसाद ओकचा हा १०० वा सिनेमा आहे. यावरुन रितेश म्हणाला...

अभिनेता प्रसाद ओकचा 'वडापाव' हा आगामी सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे हा प्रसादचा १०० वा सिनेमा आहे. गेली अनेक वर्ष प्रसाद मराठी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टी गाजवत. अनेक दर्जेदार मालिकांमध्ये त्याने काम केलं. नंतर सुपरहिट सिनेमेही दिले. आतापर्यंतच्या मेहनतीचं फळ म्हणजे आज त्याचा १०० वा सिनेमा येत आहे. अभिनेता रितेश देशमुखने काल 'वडापाव'च्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. तेव्हा तो प्रसाद ओकबद्दल काय म्हणाला बघा

'वडापाव'च्या स्क्रीनिंगला सिनेमातील कलाकारांसह निर्माते अमेय खोपकर, रितेश देशमुख, सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे यांनीही हजेरी लावली. प्रसाद ओकनेच सिनेमाचं दिग्दर्शनही केलं आहे. ट्रेलर लाँचवेळी रितेश देशमुख म्हणाला, "प्रसादजी १०० सिनेमे, आताच ३ झाले. म्हणजे वर्षाला बहुतेक १० आहेत. आज शतक मारलं त्याबद्दल खूप अभिनंदन. तुमचं नाव, तुमचं काम हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितच आहे. पण मी तुमचा फार मोठा चाहता आहे. मला तुमचं काम प्रचंड आवडतं. लेखक, दिग्दर्शक, अभिनय सगळ्यात तुम्ही उत्कृष्ट आहातच आणि ते सगळं 'वडापाव' या सिनेमातही दिसतं." रितेश देशमुखच्या या कौतुकपर शब्दांनी प्रसादही भारावून गेला आणि त्याने रितेशचे आभार मानले. एव्हीके पिक्चर्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर व्हिडिओ शेअर केला आहे. 

ट्रेलरमधून कौटुंबिक नात्यांचे गोड–तिखट वळणं, हास्याची खमंग फोडणी आणि भावनिक प्रसंगांचा स्पर्श प्रेक्षकांच्या मनाला भिडतो. सिनेमागृहात प्रेक्षकांना हसवतानाच काही क्षण डोळ्यात पाणी आणणारा हा सिनेमा नातेसंबंधांबद्दल नव्याने विचार करायला भाग पाडतो, हे ट्रेलर पाहूनच जाणवतं.

प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडापाव' या चित्रपट एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनरअंतर्गत हा चित्रपट निर्मित झाला आहे. निर्माते अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन असून सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल आहेत. छायाचित्रण दिग्दर्शक संजय मेमाणे तर लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केलं आहे. 'वडापाव' या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या भूमिका आहेत. येत्या २ ॲाक्टोबर रोजी प्रेक्षकांना या 'वडापाव'ची चव चाखता येणार आहे.

टॅग्स :रितेश देशमुखप्रसाद ओक मराठी अभिनेतामराठी चित्रपट