आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. शिवजयंतीनिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिवरायांचा जन्म ज्या ठिकाणी झाला अशा शिवनेरीवर शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. याच ठिकाणी अभिनेता रितेश देशमुखही आज उपस्थित आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी आलेल्या रितेशच्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
बालशिवाजीला पाहून रितेशने काय केलं?रितेश देशमुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात शिवनेरीवर रितेश मनोभावे छत्रपती शिवरायांसमोर हात जोडून त्यांना प्रणाम करतो. लाडक्या रितेशला भेटायला काही लहान मुलं तिथे उपस्थित असलेली दिसतात. सर्वांना पाहताच रितेश थांबतो आणि प्रेमाने त्यांची विचारपूस करतो. इतक्यात रितेशचं लक्ष बालशिवाजीच्या रुपात असलेल्या छोट्या मुलाकडे जातं. रितेश त्या चिमुकल्याचा हात हातात घेऊन त्याच्यासमोर झुकतो आणि शिवरायांप्रती आदर दर्शवतो.
पुढे बालशिवाजीच्या रुपात असलेल्या आणखी एक लहान मुलगा रितेशला भेटायला येतो. तो रितेशच्या पाया पडायला खाली वाकतो तोच अभिनेता त्याला उठवतो. त्याच्यासमोरही रितेश अदबीने झुकतो. पुढे सर्व लहान मुलांची प्रेमाने विचारपूस करुन रितेश त्यांच्यासोबत फोटो काढतो. अशाप्रकारे रितेशची ही कृती सर्वांचं मन जिंकून गेली. रितेश लवकरच आगामी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. यात रितेशसह सलमान खान, संजय दत्त हे बॉलिवूडचे मोठे कलाकार मराठी सिनेमात बघायला मिळणार आहेत.
Web Summary : Riteish Deshmukh visited Shivneri on Shiv Jayanti, paying respects to Shivaji Maharaj. He respectfully greeted children, including one dressed as 'Bal Shivaji', winning hearts. He will soon portray Shivaji Maharaj in a film.
Web Summary : रितेश देशमुख शिव जयंती पर शिवनेरी गए और शिवाजी महाराज को श्रद्धांजलि दी। उन्होंने 'बाल शिवाजी' के रूप में सजे एक बच्चे सहित बच्चों का सम्मानपूर्वक अभिवादन किया, जिससे लोगों का दिल जीत लिया। वह जल्द ही एक फिल्म में शिवाजी महाराज की भूमिका निभाएंगे।