Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच नाटक पाहून भारावून गेली रिंकू; डोळ्यात तरळलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 16:19 IST

Rinku rajguru: अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेल्या रिंकूने पहिल्यांदाच नाटक पाहण्याचा अनुभव घेतला.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु (rinku rajguru). सैराट, मेकअप, कागर अशा कितीतरी सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. उत्तम अभिनय आणि रोखठोक बोलण्याची शैली यामुळे रिंकू अल्पावधीत लोकप्रिय झाली. रिंकू सोशल मीडियावर सक्रीय असून कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असते. यावेळी तिने नाटकाविषयी एक पोस्ट शेअर केली आहे.

अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेल्या रिंकूने पहिल्यांदाच नाटक पाहण्याचा अनुभव घेतला. हे नाटक पाहिल्यावर ती प्रचंड भारावून गेली. त्यामुळे या नाटकाविषयी तिने एक पोस्ट शेअर केली आहे. सोबतच काही फोटोदेखील तिने पोस्ट केले आहेत. "माझ्या आयुष्यातील मी पाहिलेलं पहिलंच नाटक. अप्रतिम अनुभूती. सगळ्याच अंगाने सर्वांगसुंदर असं नाटक आहे 'देवबाभळी'. प्राजक्त आणि सगळ्या टीमला खूप शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन !", असं कॅप्शन रिंकूने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, रिंकूची ही पोस्ट पाहिल्यावर अनेकांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी रिंकूचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र ट्रोल केलं आहे. मराठी अभिनेत्री असूनही मराठी नाटकांना जात नाहीस, असं म्हणत लोकांनी तिच्यावर ताशेरे ओढले आहेत.

टॅग्स :रिंकू राजगुरूसेलिब्रिटीनाटक