Join us

शाहरुखच्या 'सर्कस' मालिकेतील मारियासाठी रेणुका शहाणेंना नव्हती पहिली पसंती, पण अशी मिळाली ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 10:48 IST

Renuka Shahane : अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी १९८९ साली दूरदर्शन वाहिनीवर प्रसारीत झालेल्या सर्कस मालिकेत काम केले होते. या मालिकेत अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. अभिनेत्रीने मालिकेत ख्रिश्चन मुलगी मारियाची भूमिका साकारली होती.

अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. मात्र हम आपके है कौन या सिनेमातून त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता लवकरच त्या महेश मांजरेकर यांच्यासोबत देवमाणूस सिनेमात झळकणार आहेत. दरम्यान एका मुलाखतीत त्यांनी शाहरुख खान(Shah Rukh Khan)ची लोकप्रिय मालिका 'सर्कस'(Circus Serial) मध्ये त्यांची निवड कशी झाली, याबद्दल सांगितले. 

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी १९८९ साली दूरदर्शन वाहिनीवर प्रसारीत झालेल्या सर्कस मालिकेत काम केले होते. या मालिकेत अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. अभिनेत्रीने मालिकेत ख्रिश्चन मुलगी मारियाची भूमिका साकारली होती. या मालिकेत खरेतर रेणुका यांना मारियाच्या भूमिकेसाठी निवड झाली नव्हती. मात्र त्यांना ही भूमिका कशी मिळाली याबद्दल त्यांनी कॅचअप या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्या म्हणाल्या की, माझं पहिल्यापासूनचंच मला वाटतं की कास्टिंग जसं होतं ना जे लोक माझं नाव सूचवतात ते 'हम आपके है कौन?' सोडून ते मला कधीच भेटले नव्हते आणि म्हणजे सर्कसमध्ये अमोल गुप्तेंनी माझं कास्टिंग केलं. त्यांनी अजीज मिर्झांना सूचवलं की शांता गोखल्यांची मुलगी मला वाटते काम करते. तिला बोलवून घ्या. 

अशी लागली मारियाच्या भूमिकेसाठी वर्णीरेणुका शहाणे पुढे म्हणाल्या की, मला त्या भूमिकेसाठी बोलवलंच नव्हते. वेगळ्या भूमिकेसाठी बोलवले होते. पण नशीबात जे असते त्याप्रमाणे ते स्क्रीप्ट वाचनासाठी उपलब्ध नव्हते. पूर्वी ऑडिशन नाही वाचन करूनच ठरवायचे. तर ते म्हणाले काही हरकत नाही. मारियाच्या रोलचे स्क्रीप्ट आहे तू वाच आणि मी वाचल्यानंतर अजीज अंकल म्हणाले की, नाही नाही. हीच माझी मारिया. त्यामुळे म्हणजे किती योगायोग असावा बघ. 

टॅग्स :रेणुका शहाणे