'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक सिनेमाचं पुढचं पुष्प म्हणून 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमाकडे पाहिलं जात होतं. येत्या ३० जानेवारी २०२६ ला हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु रिलीजला दोन दिवस बाकी असताना या सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे. जाणून घ्या 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमाची नवी रिलीज डेटआता या तारखेला रिलीज होणार 'रणपति शिवराय'
दिग्पाल लांजेकर आणि 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे. हा सिनेमा आता ३० जानेवारी ऐवजी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या रिलीज डेटबद्दल आज खुलासा झाला आहे. त्यामुळे 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षकांना आणखी एक आठवडा वाट बघावी लागणार आहे.
‘पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य सिनेमाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा, आलोक शर्मा (मुगाफी) आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.
मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक कलाकारांच्या भूमिका आहेत. पॅनोरमा स्टुडिओज या चित्रपटाचे जगभरात (वर्ल्ड वाईड) वितरण करणार आहे.
Web Summary : The release date for 'Ranapati Shivray Swari Agra' has been shifted from January 30 to February 6, 2026. Fans will have to wait an extra week to see the film directed by Digpal Lanjekar.
Web Summary : 'रणपति शिवराय स्वारी आगरा' की रिलीज डेट 30 जनवरी से 6 फरवरी, 2026 तक बदल दी गई है। दिगपाल लांजेकर द्वारा निर्देशित फिल्म देखने के लिए प्रशंसकों को एक अतिरिक्त सप्ताह इंतजार करना होगा।