Join us
Daily Top 2Weekly Top 5

असा चढला सेलिब्रिटींवरही होळीचा रंग, पाहा रंगकर्मीचे खास सेलिब्रेशन PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 14:04 IST

'बुरा नो मानो होली है' म्हणत यावेळी सारे कलाकार मंडळी आपल्या कुटुंबासह या रंगकर्मी होळीच्या सेलिब्रेशनसाठी हजर होते. कुठेही पाण्याचा अतिवापर होणार नाही याची विशेष काळजी यावेळी घेण्यात आली होती. 

आज आसंमतामध्ये रंग बरसेचा नाद घुमतोय... लहानथोर सारेच विविध रंगात रंगून गेलेत... त्यामुळे आपले सेलिब्रेटी मंडळीतरी कसे मागे राहणार ते ही होळीच्या रंगात रंगून गेल्याचे पाहायला मिळत आहे. आनंद आणि जल्लोषाचा सण रंगपंचमी.... सारेच होळी रे होळी म्हणत रंगात न्हाऊन गेलेत....रंगकर्मी होळीचे सेलिब्रेशन जोरदार झाल्याचे पाहायला मिळाले.  मराठी कलाकारांची दोन गटात साजरी होणारी रंगपंचमी “रंगकर्मी ” निमित्ताने एकत्रित साजरी करण्यात आली. ही मंडळी एकत्र जमून ह्या सोहळ्याचा आनंद लुटताना दिसले. 

'बुरा नो मानो होली है' म्हणत यावेळी सारे कलाकार मंडळी आपल्या कुटुंबासह या रंगकर्मी होळीच्या सेलिब्रेशनसाठी हजर होते. कुठेही पाण्याचा अतिवापर होणार नाही याची विशेष काळजी यावेळी घेण्यात आली होती. 

टॅग्स :होळी 2023