रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेल्या 'राजा शिवाजी' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत हा सिनेमा थोड्याच दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांना 'राजा शिवाजी' सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता आहे. आता सिनेमाच्या ट्रेलरबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. 'राजा शिवाजी'चा ट्रेलर लाँच सोहळा उद्या अर्थात २० एप्रिलला मुंबईत पार पडणार आहे. जाणून घ्या काय असणार खास?'राजा शिवाजी'च्या ट्रेलर लाँचविषयीरितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर लाँच उद्या सोमवारी २० एप्रिलला पार पडणार आहे. सिनेमातील प्रमुख कलाकार या ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याआधी 'राजा शिवाजी' सिनेमाच्या अँथम साँगने प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे केले. आता ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेची झलक पाहायला मिळणार आहे. याशिवाय इतक्या दिवसांपासून सलमान खान 'राजा शिवाजी' सिनेमात दिसणार की नाही? या गोष्टीची चर्चा होती. त्यामुळे ट्रेलरमध्ये भाईजानच्या भूमिकेची झलक पाहायला मिळणार का, याचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाचं अँथम साँग प्रचंड गाजलं. आता ट्रेलरमध्ये आणखी काही गाण्यांची झलक प्रेक्षकांसमोर निश्चितच येतील. अजय-अतुल यांनी संगीतबद्ध गेलेली गाणी ऐकायला प्रेक्षकांचे कान आतुर झाले आहेत. त्यामुळे 'राजा शिवाजी'च्या ट्रेलर लाँच सोहळा खूप खास असणार आहे.
Web Summary : Riteish Deshmukh's 'Raja Shivaji' trailer launches April 20th in Mumbai. The event will be held at PVR Maison, Jio World Drive, BKC, at 11:30 AM. The film boasts a stellar cast and is set to release on May 1, 2026.
Web Summary : रितेश देशमुख की 'राजा शिवाजी' का ट्रेलर 20 अप्रैल को मुंबई में लॉन्च होगा। कार्यक्रम सुबह 11:30 बजे पीवीआर मैसन, जियो वर्ल्ड ड्राइव, बीकेसी में होगा। फिल्म में कलाकारों की टुकड़ी है और 1 मई, 2026 को रिलीज होने वाली है।