Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राजा शिवाजी' सिनेमा किती तासांचा असणार? ॲडव्हान्स बुकिंग करताना झाला खुलासा, चाहत्यांना आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 13:37 IST

'राजा शिवाजी' किती तासांचा असणार याविषयी मोठी माहिती समोर आली आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकींग करताना प्रेक्षकांना ही माहिती मिळाली आहे.

'राजा शिवाजी' चित्रपटाची उत्सुकता शिगेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर हा चित्रपट आधारीत आहे. रितेश देशमुखने या चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. इतकंच नव्हे या चित्रपटात रितेश छत्रपती शिवरायांची प्रमुख भूमिकाही साकारणार आहे. अशातच 'राजा शिवाजी' किती तासांचा असणार याविषयी मोठी माहिती समोर आली आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकींग करताना प्रेक्षकांना ही माहिती मिळाली आहे.इतक्या तासांचा असणार 'राजा शिवाजी'रितेश देशमुख लिखित-दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपट तब्बल ३ तास १५ मिनिटांचा असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना थिएटरमध्ये शिवरायांची शौर्यगाथा अधिक सविस्तरपणे आणि भव्यदिव्य पद्धतीने पाहता येईल. चित्रपटाच्या रनटाईमबद्दल ही माहिती समोर आल्याने सर्वांना आनंद झाला आहे. आजपासून 'राजा शिवाजी'च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. ॲडव्हान्स बुकिंग करताना 'राजा शिवाजी'ची जी सविस्तर माहिती समोर आली त्यामध्ये चित्रपटाच्या लांबीचा खुलासा केला. विशेष म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग सुरु झाल्यापासून अवघ्या काही तासांत सुमारे १४०० हून अधिक प्रेक्षकांनी चित्रपटाचं तिकिट काढलं आहे. 

'राजा शिवाजी' चित्रपटाविषयी‘राजा शिवाजी’मध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची प्रभावी उपस्थिती पाहायला मिळणार आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारख्या कलाकारांचा भव्य संच या चित्रपटाला अधिक मोठेपणा प्रदान करतो. हा चित्रपट १ मे २०२६ ला प्रदर्शित होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Raja Shivaji' runtime revealed during advance booking; fans excited.

Web Summary : Ritesh Deshmukh's 'Raja Shivaji,' based on Shivaji Maharaj's valor, is 3 hours 15 minutes long. Advance bookings opened today, revealing the runtime, exciting fans. The film boasts a star-studded cast and releases on May 1, 2026.
टॅग्स :राजा शिवाजी चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजामराठी चित्रपटमराठी अभिनेता