Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझे काही सीन्स सिनेमातून कट झाले पण...", 'राजा शिवाजी'मध्ये तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 13:28 IST

मालिकेत काम केलेल्या काही मराठी कलाकारांची वर्णीही 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमात लागली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे मयुर मोरे. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या अभिनेता मयुर मोरे याने 'राजा शिवाजी' सिनेमात युवा तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली. 

Raja Shivaji Movie: रितेश देशमुखचं दिग्दर्शन असलेला 'राजा शिवाजी' सिनेमा अखेर १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमात मराठी आणि बॉलिवूड कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळते. मालिकेत काम केलेल्या काही मराठी कलाकारांची वर्णीही 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमात लागली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे मयुर मोरे. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या अभिनेता मयुर मोरे याने 'राजा शिवाजी' सिनेमात युवा तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली. 

सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मयुर मोरेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो, "या चित्रपटातील माझे काही सीन अंतिम कटमध्ये नसले तरी, माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या महाराजांच्या शौर्यगाथेला पडद्यावर आणणाऱ्या या भव्य सिनेमाचा मी एक भाग होतो…‘युवा तानाजी मालुसरे’ साकारण्याची संधी मिळणं, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे". याआधी मयुर प्रेमाची गोष्ट, तुला शिकवीन चांगलाच धडा, फुलाला सुगंध मातीचा, तू अनोळखी तरी सोबती या मालिकांमध्ये दिसला होता. 'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल त्याचं कौतुक होत आहे. 

दरम्यान, 'राजा शिवाजी' सिनेमात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. अभिषेक बच्चन संभाजीराजे भोसले, भाग्यश्री राजमाता जिजाऊ, संजय दत्त अफजलखान, जिनिलीया महाराणी सईबाई, फरदीन खान शाहजहान, सलमान खान जीवा महाला अशी स्टारकास्ट आहे. तर जितेंद्र जोशी, दिशा परदेशी, शिवानी मुंढेकर, सिद्धार्थ जाधव हे कलाकारही झळकले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Actor's Scenes Cut from 'Raja Shivaji', Still Proud of Role

Web Summary : Mayur More, who played young Tanaji Malusare in 'Raja Shivaji', is proud despite his scenes being cut. The film, directed by Riteish Deshmukh, features a star-studded cast including Riteish, Abhishek Bachchan and Sanjay Dutt. Mayur previously acted in popular TV series.
टॅग्स :राजा शिवाजी चित्रपटरितेश देशमुखटिव्ही कलाकार