सध्या 'राजा शिवाजी' सिनेमाची चांगलीच उत्सुकता आहे. या सिनेमाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातून 'राजा शिवाजी' सिनेमाला प्रेक्षकांचा हाउसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. अशातच 'राजा शिवाजी' सिनेमात येसाजी कंक ही भूमिका साकारणारा अभिनेता कपिल होनरावने सिनेमाबद्दल त्याची खास आठवण सांगितली आहे. याशिवाय 'राजा शिवाजी'च्या दुसऱ्या भागाबद्दल हिंट दिली आहे. कपिलने सोशल मीडियावर 'राजा शिवाजी'चे पडद्यामागचे क्षण शेअर केले आहेत. यात कपिल तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकताना दिसतोय. हे व्हिडीओ पोस्ट करुन कपिल लिहितो, ''राजा शिवाजी आता फक्त एक फिल्म नाही… तो प्रत्येकाच्या मनातली भावना बनला आहे. या चित्रपटामुळे माझ्यासारख्या टीव्ही अभिनेत्याला नॅशनल लेव्हलवर ओळख मिळाली, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे.२ महिने तलवारबाजी, घोडेस्वारी आणि खूप कडक ट्रेनिंग… त्या सगळ्या मेहनतीमागे एकच स्वप्न होतं — मोठ्या पडद्यावर स्वतःला पाहण्याचं.''
Web Summary : Actor Kapil Honrao, who played Yesaji Kank in 'Raja Shivaji,' shared behind-the-scenes moments and hinted at a sequel titled 'Raja Shivchhatrapati.' He expressed gratitude for the opportunity and rigorous training, promising to return soon.
Web Summary : 'राजा शिवाजी' में येसाजी कंक की भूमिका निभाने वाले अभिनेता कपिल होनराव ने पर्दे के पीछे के क्षणों को साझा किया और 'राजा शिवछत्रपति' नामक एक सीक्वल का संकेत दिया। उन्होंने अवसर और कठोर प्रशिक्षण के लिए आभार व्यक्त किया, और जल्द ही लौटने का वादा किया।