Join us
Daily Top 2Weekly Top 5

समर्थ रामदासांचा महिमा जगासमोर येणार, 'रघुवीर'चा ट्रेलर भेटीला! या तारखेला सिनेमा होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 15:35 IST

समर्थ रामदासांच्या आयुष्याचा वेध घेणार 'रघुवीर' सिनेमाचा ट्रेलर भेटीला (raghuveer)

गेल्या काही महिन्यांपासून 'रघुवीर' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. समर्थ रामदास स्वामींच्या आयुष्यावर आधारीत हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी 'रघुवीर' सिनेमाचं पोस्टर लॉंच झालं. या पोस्टरमध्ये नदीच्या पाण्यातून श्रीरामांची मूर्ती बाहेर काढणारे समर्थ रामदास पाहायला मिळाले. सर्वांना सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता होती. अखेर आज नुकतंच सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय. 

'रघुवीर' सिनेमाचा ट्रेलर

समर्थ रामदास स्वामींच्या आयुष्याचा घेतलेला वेध ट्रेलरमध्ये पाहायाला मिळतो. यामध्ये छोटा नारायण आईच्या संस्काराची शिदोरी घेऊन समाजाचं कल्याण करण्याचा ध्यास घेतो. पुढे हाच नारायण समर्थ रामदास स्वामींच्या रुपात जनतेला शिकवण देताना दिसतो. आदिलशाहापुढेही न झुकणारे रामदास स्वामी आम्ही तुमचे नाही तर प्रभू श्रीरामांचे गुलाम असं ठणकावून सांगतात. पुढे विविध ठिकाणी भ्रमंती करत समर्थ रामदास समाजातील लोकांच्या मनात चांगल्या विचारांची मूल्य रुजवताना दिसतात. ३ मिनिटांच्या या ट्रेलरने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलाय.

'रघुवीर' सिनेमा कधी होणार रिलीज

निलेश कुंजीर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'रघुवीर' हा सिनेमा घोषणा झाल्यापासून कायम चर्चेत राहिला आहे. समर्थांच्या भूमिकेत अभिनेते विक्रम गायकवाड दिसणार असल्याचे उघड झाल्यानंतर 'रघुवीर'बाबतची उत्सुकता आणखी वाढली. 'रघुवीर' या आगामी सिनेमाद्वारे समर्थांचा महिमा जगासमोर येणार आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची आहे २३ ऑगस्ट. सिनेमात विक्रम गायकवाडसोबतच ऋतुजा देशमुख, शैलेश दातार आणि मौसमी तोंडवळकर हे कलाकार सुद्धा पाहायला मिळत आहेत.

टॅग्स :मराठी चित्रपट