Join us

भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:34 IST

मनोरंजन क्षेत्रातील अनेक मोठे कलाकार मुंबई सोडून दुबईमध्ये आपले दुसरे घर वसवताना दिसत आहेत.

Pushkar Jog UAE Golden Visa: दुबई (संयुक्त अरब अमीरात - UAE) हे अनेक भारतीय कलाकारांसाठी एक आवडते ठिकाण बनले आहे.  केवळ सुट्ट्यांसाठी नव्हे, तर कायमस्वरूपी वास्तव्यासाठी किंवा व्यावसायिक कारणांसाठी अनेक सेलिब्रिटी दुबईला शिफ्ट होत आहेत. अनेक कलाकारांना UAE चा गोल्डन व्हिसा मिळाला आहे, ज्यामुळे त्यांना दुबईत दीर्घकाळ राहणे, काम करणे आणि व्यवसाय करणे सोपे झाले आहे. त्यामुळे अनेक कलाकार कामासाठी भारतात असले तरी त्यांचे घर किंवा कुटुंब दुबईत स्थायिक झाले आहे. अशातच लोकप्रिय मराठी अभिनेता पुष्कर जोग याला UAE चा गोल्डन व्हिसा मिळाला आहे.

पुष्कर जोगने फेसबूकवर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी आणि तिच्या कल्याणासाठी UAE चा गोल्डन व्हिसा मिळवण्याचं त्यानं सांगितलं. पोस्टमध्ये त्यानं लिहलं, "आज मला माझा गोल्डन व्हिसा मिळाला… आता मी अधिकृतपणे यूएईचा रहिवासी झालो आहे. हे सगळं माझ्या मुलीसाठी, तिच्या आनंदासाठी आणि कल्याणासाठी आहे. तिच्या भविष्यासाठी.थँक्यू आई-बाबा, थँक्यू डॉ. अमोल सुहास जोग आणि देवाचेही आभार".

फक्त पुष्कर जोग हाच नाहीतर अनेक कलाकारांनी दुबईला आपलं दुसरं घर बनवलं आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमारने दुबईत वास्तव्य केले आहे. अभिनेता आर. माधवन आणि त्याचे कुटुंब दुबईत शिफ्ट झाले आहे. संजय दत्तचे कुटुंब दुबईत वास्तव्यास असते. अभिनेत्री मौनी रॉयनेही गोल्डन व्हिसा मिळवला असून दुबईत तिचे घर आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय हा यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळखला जातो. तो कोविड महामारीच्या काळात दुबईला शिफ्ट झाला होता. 

बालकलाकार, अभिनेता, दिग्दर्शक ते निर्माता

बालकलाकार म्हणून नावारूपास आलेल्या पुष्करने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे एक वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. बालकलाकार, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता असा प्रवास त्याने केला आहे. त्याने नेहमीच चिकाटीने, मेहनतीने आपले ध्येय साध्य केले.  पुष्करने १९९२ पासून बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकीर्द सुरू केली. बालकलाकार म्हणून त्याने १० चित्रपट केले. या कारकिर्दीत त्याने २००० मध्ये राज्य सरकारचा 'सर्वोत्कृष्ट बालकलाकार' म्हणून पुरस्कारही पटकावला. मात्र त्यानंतर त्याने शिक्षणासाठी ब्रेक घेतला, शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००७मध्ये पुष्करने 'जबरदस्त' चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केले. चित्रपट प्रचंड गाजला. त्यानंतर त्याने अनेक चित्रपट केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pushkar Jog gets UAE Golden Visa for daughter's better future.

Web Summary : Marathi actor Pushkar Jog secures UAE Golden Visa, joining other Indian celebrities. He dedicates this achievement to his daughter's future and well-being, now a UAE resident.
टॅग्स :पुष्कर जोगसंयुक्त अरब अमिरातीदुबई