Join us
Daily Top 2Weekly Top 5

वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे विज यांच्या पियानो फॉर सेल या मराठी नाटकाचा असा झाला प्रीमियर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 12:28 IST

पियानो फॉर सेल या नाटकासाठी मराठी इंडस्ट्रीतील दोन दिग्गज कलाकार प्रथमच एकत्र आलेले आहेत. त्यामुळे रसिक प्रेक्षकांना हा अनुभव प्रचंड आनंददायी ठरणार आहे .

ठळक मुद्देलेखिका मेहेर पेस्तोनजी लिखित पियानो फॉर सेल या मूळ इंग्रजी नाटकाचे नाट्य रुपांतर आणि दिग्दर्शन हे आशिष कुलकर्णी यांचे आहे. अत्यंत आगळ्या वेगळ्या विषयाच्या या नाटकाचे प्रयोग १ डिसेंबर २०१८ पासून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच परदेशातही करण्याचे प्रयोजन केले आहे.

पियानो फॉर सेल या दोन पात्री नाटकाचा प्रीमियर ३० नोव्हेंबर २०१८ रोजी, दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये पार पडला. नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला या वेळी मराठी चित्रपट सृष्टीतील तसेच नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलाकार आवर्जून उपस्थित राहिले. उषा मंगेशकर ,मीना खडीकर, शिवाजी साटम, किरण शांताराम, अनुप जलोटा, दिपक बलराज विज, गश्मीर महाजनी, अनुराधा राजध्याय आदी मान्यवर उपस्थित होते. 

पियानो फॉर सेल या नाटकासाठी मराठी इंडस्ट्रीतील दोन दिग्गज कलाकार प्रथमच एकत्र आलेले आहेत. त्यामुळे रसिक प्रेक्षकांना हा अनुभव प्रचंड आनंददायी ठरणार आहे . हा अनुभव रंगभूमीवरचा असल्याने तो अधिक रंगतदार ठरतोय. या दिग्गजांचा अभिनय, त्यांच्यातली संवादांची जुगलबंदी विषयाच्या आशयाला आणि सादरीकरणाला एका अतुलनीय उंचीवर घेऊन गेले आहेत.  प्रस्तुतकर्ते चैतन्य गिरीश अकोलकर आणि डिजिटल डिटॉक्स निर्मिती संस्था यांच्या पियानो फॉर सेल या नाटकाद्वारे एक वेगळा अतुलनीय अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे आणि या नाटकाच्या निमित्ताने ज्या दोन दिग्गज अभिनेत्री प्रथमच रंगभूमीवर एकत्र येत आहेत त्या आहेत, वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे विज.

लेखिका मेहेर पेस्तोनजी लिखित पियानो फॉर सेल या मूळ इंग्रजी नाटकाचे नाट्य रुपांतर आणि दिग्दर्शन हे आशिष कुलकर्णी यांचे आहे. अत्यंत आगळ्या वेगळ्या विषयाच्या या नाटकाचे प्रयोग १ डिसेंबर २०१८ पासून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच परदेशातही करण्याचे प्रयोजन केले आहे.

नाटक हे असं व्यासपीठ आहे जिथे प्रत्येक कलावंताच्या अभिनयाचा कस लागतो. कलावंताला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. चित्रपट, मालिकांमध्ये काम केले तरी नाटकांत काम करण्याची मजा काही औरच असते, असं खरंतर प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. अभिनेत्री किशोरी शहाणे विज आणि अभिनेत्री वर्षा उसगांवकर या दोघींसाठी ‘पियानो फॉर सेल’ या नाटकाचा अनुभव खूपच चांगला असल्याचे त्या आवर्जून सांगतात. ‘मोरूची मावशी’,‘भ्रमाचा भोपळा’ यांसारख्या नाटकांमध्ये किशोरी शहाणे यांनी पूर्वी काम केले आहे. त्या अनेक वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीकडे वळत आहेत. 

टॅग्स :किशोरी शहाणे