Join us

'मंजू…!!! खूप खूप प्रेम...', प्रसाद ओकची लाडक्या बायकोसाठी खास पोस्ट; असं' केलं सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 13:57 IST

आज मंजिरी ओक हिचा वाढदिवस आहे.

अभिनेता प्रसाद ओक आणि मंजिरी ओक ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. आज मंजिरी हिचा वाढदिवस आहे. बायको मंजिरी ओक हिच्या वाढदिवसाच्या दिवशी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत मंजिरीचा वाढदिवस त्याने अधिक स्पेशल केला आहे. 

 प्रसाद ओकने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. मंजिरीसोबतचा एक गोड फोटो त्यानं पोस्ट केला आहे. या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये प्रसादने लिहिलं की, 'Happy birthday मंजू…!!! खूप खूप खूप प्रेम'. यासोबत अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं मंजिरीचा बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये मंजिरी केक कापून आनंद साजरा करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये अमृतानं लिहिलं, 'Happy Birthday Queen…तुमच्या कुटुंबाचा तू सगळ्यात मोठा आधारस्तंभ आहेस. माझं आणि आम्हा सर्वांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बाकी सगळं तुला माहितीच आहे…आनंदी राहा. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!'. यावर 'थँक्यू सो मच लव्ह' अशी कमेंट करत मंजिरीनं अमृताचे आभार मानले आहेत. या पोस्टवर आता चाहते आणि इतर कलाकार मंडळींनी देखील भरभरून कमेंट्स केल्या आहेत. 

प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे दोघेहीजण एकमेकांवर आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम करतात. तसेच एकमेकांच्या भावनांचा आदरही करतात. मराठी सिनेसृष्टीतील या जोडीचं चाहते नेहमीच कौतुक करतात. दोघांमधील खास बॉन्डिंग कायम दिसून येतं. मंजीरी फक्त सोशल मीडियावर सक्रिय नसते तर सोशल मीडियावर भन्नाट व्हिडीओ देखील शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. 

टॅग्स :प्रसाद ओक सेलिब्रिटीमराठी अभिनेतामराठी चित्रपटअमृता खानविलकर